Header Ads Widget

Responsive Advertisement

सन 2022-2023 या शैक्षणिक सत्राकरिता "धनगर" समाजाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 30 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे प्रशासनाने केले आवाहन.(संपर्क- सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गडचिरोली) P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


 पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम" योजना 

वि.जा.,भज प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज आंमत्रित


गडचिरोली/दि.26: विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखिल शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना "पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना" अंतर्गत शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि. 06 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये "पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना" सुरु करण्यात आलेली आहे. 

  या योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यलयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी च्या परिक्षेमध्ये 60% गुण असणे अनिवार्य आहे.

या योजनेमध्ये दिव्यांग (विजाभज प्रवर्गातील धनगर समाज) प्रथम आरक्षण असेल. या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्याने विजाभज, इमाव, विमाप्र, कल्याण विभागाच्या महाडिबीटी पोर्टलवरील अर्ज मंजुर झालेला असावा.सदर योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्याचे वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरीता  विद्यार्थ्यांनी दिनांक 30 डिसेंबर 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे,योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत नमुना कार्यालयात उपलब्ध आहे.असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले  आहे.

                       


Post a Comment

0 Comments