Header Ads Widget

Responsive Advertisement

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले निकाली. P10NEWS

 

   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले निकाली. P10NEWS 

गडचिरोली / दि.10 : न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा विचार करता. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी मामल्याकरीता राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले आणि रुपये 3,14,53,699/- वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरुपाच्या प्रकरणामध्ये एकुण 76 प्रकरणे गुन्हा कबूली द्वारे निकाली काढण्यात आले. 


मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणापैकी एकुण 197 प्रकरणे निकाली व रक्कम 1,19,580 /- वसुली करण्यात आली.

एका वैवाहिक वादाच्या प्रकरणात पती-पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख व  सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल यांनी समस्त न्यायाधिश वृंद यांचे उपस्थितीत उभयतांचा साडी-चोडी व शेला देवून सत्कार केला. जिल्हा व सत्र न्यायाधिश  तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यु.बी. शुक्ल व  सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते..


त्याचप्रमाणे मोटार अपघात नुकसान भरपाई च्या एका प्रकरणातील अर्जदार ही मयत इसमाची वयोवृध्द आई  होती.त्यांना त्यांचे नातेवाईक वाहनाने न्यायालयात घेवून आले होते. परंतु त्यांना चालता येत नसल्याने न्यायालयात पहिल्या मजल्यावरील पॅनल समोर उपस्थित राहता येत नव्हेते.त्यावर जिल्हा न्यायाधिश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश तथा पॅनल प्रमुख मुधोळकर  यांनी स्वत:न्यायालयाबाहेर येवून त्या वाहनाजवळ जावून सदर अर्जदार महिलेस तडजोडीचे मुद्दे समजावून सांगितले व पडताळणी केली.मा.न्यायाधिश या संवेदनशीलतेबाबत पक्षकारांनी व उपस्थितांनी समाधान व्यकत केले व न्याय आपल्या दारी या उक्तीचा सर्वाना प्रत्यय आला.

अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर.आर.पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. 

जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांनी पॅनल क्र01 वर काम पाहिले, पॅनल क्र02 वर एस.पी सदाफळे , दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी, पॅनल क्र.03 वर सहदिवाणी न्यायाधिश (क-स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) सी.पी. रघुवंशी यांनी काम पाहिले.

दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषित करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.प्र.सं.कलम 256, 258 अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता श्रीमती.एन.सी.सोरते, तृतीय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायादंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांचे न्यायालयात कार्यरत होते.

तसेच पॅनल क्रमांक 01 मध्ये सदस्य म्हणून विधी स्वयंसवक नरेंद्र मोटघरे, पॅनल 02 मध्ये सदस्य म्हणून विधी स्वयंसवक लुकेश सोमनकर, ,पॅनल क्रमांक 3 मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वंयसेविका स्नेहल चरडूके  यांनी काम केले.                                                                                  सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली च्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

                       

          

          मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक.                                      ( EDITOR IN CHIEF)

Post a Comment

0 Comments