Header Ads Widget

Responsive Advertisement

ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख बदलली, 13 ऑक्टोबरचे मतदान ढकलले पुढे ,16 ऑक्टोबर 2022 रविवारी सकाळी होणार P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या

सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात अशत: बदल


गडचिरोली,/दि.27:सचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम देण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार दिनांक 13 ऑक्टोबर 2022 हा मतदानाचा दिनांक असून दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्याच्या दिनांक आहे. याबाबत दिनांक 08 सप्टेंबर 2022 अन्वये जाहीर प्रसिद्धी देण्यात आलेली आहे.

सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई याचे दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये सदर कार्यक्रमात अंशत: बदल करुन पुढीलप्रमाणे सुधारित कार्यक्रम दिलेला असून याबाबत शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे. 

निवडणूकीचे टप्पे- आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 16 ऑक्टोबर 2022 (रविवार), सकाळी 7.30 वाजतापासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत (नक्षलग्रस्त भागासाठी सकाळी 7.30 पासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार निश्चित करण्यात येईल.) दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार) रोजी. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक हा 20 ऑक्टोबर 2022 (गुरुवार) असेल. असे तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार, अहेरी, ओंकार शेखर ओतारी यांनी कळविले आहे. 

                         



Post a Comment

0 Comments