Header Ads Widget

Responsive Advertisement

ओबीसी प्रवर्गातील युवक यूवतींसाठी बैंकेमार्फत उच्च शिक्षणासाठी 10 ते 20 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज परतावा योजनेत सुवर्ण संधी.(संपर्क- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन आयटीआय मागे गडचिरोली) P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी सुवंर्ण संधी


गडचिरोली/ दि.26: शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 20 लाखापर्यंत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येते आहे. बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.अर्जदाराचे कौटुंबिक वार्षीक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावे. अर्जदार 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.देशांतर्गत अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) कृषी , अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान परदेशी अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) विज्ञान 5) कला बॅकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहीत्य खरेदीचा समावेश राहील परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रॅकींग 200 च्या आतील व GRE,TOEFL परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

  इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी. तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय. मागे गडचिरोली येथे संपर्क साधावा.

                          

                     


Post a Comment

0 Comments