Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्हा परिषद गडचिरोली येथील मुख्य लेखा तथा वित अधिकारी या नराधमाला शासकीय कार्यालयात महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अवघ्या दोन तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या.P10NEWS


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
 
जिल्हा परिषद गडचिरोली येथील मुख्य लेखा तथा वित अधिकारी यांनी शासकीय कार्यालयात महीलेचा  विनयभंग केल्याप्रकरणी अवघ्या दोन तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या.                         

    धक्कादायक घटना   :-                     

गडचिरोली:-GADCHIROLI :- पिडित महीला हि जिल्हा परिषद गडचिरोली येथे वरिष्ठ सहाय्यक (लेखा) येथे नौकरीवर असुन त्याच विभागात मुख्य लेखा तथा वित अधिकारी म्हणून कर्तव्यावर असलेले आरोपी नामे- ओंकार रामचंद्र अंबपकर रा.गूलमोहर कॉलनी गडचिरोली हा पाडीतेस कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याचे कार्यालयात बोलावून पिडीतेचा नेहमी विनयभंग करीत होता दिंनाक १६/११/२०२२ ते २०/११/२०२२ रोजी पर्यंत पिडीतेस लेझर काढण्यासाठी चार पाच वेळा कॅबिनमध्ये बोलाविले पिडीता लेझरचे काम करुन दाखवित असताना नमुद आरोपी यांनी पिडीत महीलेस लेझर मधील फायनल झालेल्या प्रस्तावामधील पुर्ण रक्कम ही दुरुन वाचुन दाखवु नको मला दिसत नाही,असा बहाना करुन पिडीतेचा डावा हात खिचुन त्यांचे बसलेल्या खुर्चीजवळ ओढुन पिडीतेच्या कमरेला, छातीला दाबुन जबरदस्तीने गालाचा किस घेतला, कमरेत हात टाकून माझ्या सिटला,पोटाला कमरेला दाबुन पोटाला चिमटे घेतले पिडीतेने प्रतिबंध केला असता आरोपीने पिडीतेचा सीआर खराब करून, नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन असह्यतेचा फायदा घेऊन विनयभंग करीत होता अशा पिडीतेच्या तक्रारीवरुन पोस्टे गडचिरोली येथे आरोपी नामें ओंकार अंबपकर रा. गुलमोहर कॉलनी गडचिरोली यांचे विरुद्ध विविध कलमान्वये व अनु.जा.ज.अत्या. प्रति अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. 


                                            गुन्ह्यातील आरोपी नामे - ओंकार रामचंद्र अंबपकर रा गुलमोहर कॉलनी गडचिरोली हा चंद्रपूर रोड, गडचिरोली लॅन्डमार्क हॉटेल 🏨 जवळील परिसरात लपून बसला असल्याची गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.आरोपीस दिनांक 22/11/2022 रोजी न्यायालयात पोलिस कोठडी रिमांड कामी हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास मा.पोलीस अधिक्षक सा, गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली मा. प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली हे करीत आहेत.

                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                           (EDITOR IN CHIEF).                                            


Post a Comment

0 Comments