Header Ads Widget

Responsive Advertisement

Eknath Shinde Property : अनाथांचे नाथ, एकनाथ शिंदेंची संपत्ती, 7 गाड्या, 9 कोटींची घरं, 25 लाखांचं सोनं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तूल p10news

 Eknath Shinde Property : अनाथांचे नाथ, एकनाथ शिंदेंची संपत्ती, 7 गाड्या, 9 कोटींची घरं, 25 लाखांचं सोनं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तूल

 Eknath Shinde Property : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा रिक्षाचालक ते मंत्री असा यांचा प्रवास आहे. एकनाथ शिंदेंनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे साडे अकरा कोटीची संपत्ती आहे.  

By: p10news | Updated at : 24 Jun 2022 06:02 PM (IST)

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

FOLLOW US: 


Eknath Shinde Property net worth sampatti Thane Shiv Sena leader journey Auto driver to Maharashtra Minister Marathi news latest update 

Eknath Shinde

मुंबई : शिवसेनेत (Shiv sena ) सुरुंग लावून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सत्तेला हादरा देणारे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण देशातील सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता आली आहे. त्यामुळे देशाच्या नजरा महाराष्ट्रावर आहेत. ज्यांच्या भूमिकेने हे सर्व घडत आहे ते एकनाथ शिंदे या सर्वाचे केंद्र आहेत. एकनाथ शिंदेंची राजकीय पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. रिक्षाचालक ते मंत्री असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास आहे. एकनाथ शिंदे अनेक वर्षापासून मंत्रिपदावर आहेत. एकनाथ शिंदेंनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे साडे अकरा कोटीची संपत्ती आहे. 

महाविकास आघाडीतील महत्त्वाचं असलेलं नगरविकास खातं हे गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. नगरविकास खातं हे बहुतेक मुख्यमंत्री स्वत:कडेच ठेवतात. पण उद्धव ठाकरे यांनी हे खातं  एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं. गेल्या तीन वर्षात एकनाथ शिंदे यांची संपत्ती किती वाढली याचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र 2019 मधील संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे 7 गाड्या आहेत. यामध्ये दोन स्कॉर्पिओ, दोन इनोव्हा, एक अर्माडा गाडीचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची किंमत 2019 मध्ये 46 लाख इतकी होती. 

2019 मध्ये किती गाड्या होत्या? 

स्कार्पिओ-2

बलेरो - 1 

इनोव्हा - 2

अरमाडा -1

टेम्पो -1

 एकूण किंमत - 46  लाख 

2019 मध्ये सोनं किती?

सोने : 25 लाख 87 हजार

4 लाख 12 हजाराचं 110 ग्रॅम सोनं स्वत:कडे, तर 580 ग्रॅम सोनं बायकोकडे असल्याचं शिंदेंनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या सर्व सोन्याचं त्यावेळचं मूल्य 25 लाख 87 हजार इतकं होतं.


1- रिव्हॉल्वहर

1-पिस्तूल

 

गुंतवणूक   

शिवम ट्रान्सपोर्टमध्ये तीन लाख गुंतवणूक  

बॉम्बे फूड पॅकर्स : आठ लाख

शिवम एन्टरप्रायजेस ;11 लाख

 

एकनाथ शिंदेंचा जमीन-जुमला किती? 


एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. या शेतजमीनचं हे मूल्य 2019 मधलं आहे. सध्या त्यामध्ये वाढ झाल्याचं शक्य आहे. 


कुठे कुठे जमिनी? 

दरे गाव, महाबळेश्वरमध्ये 5 हेक्टर म्हणजेच जवळपास 12 एकर जमीन आहे.

चिखलगाव, ठाणे इथे पत्नीच्या नावे - 1.26 हेक्टर जमीन आहे. 


व्यावसायिक इमारती


वागळे इस्टेटमध्ये पत्नीच्या नावे 30 लाखांचा दुकान गाळा.


रहिवाशी इमारत

1 खोली - धोत्रे चाळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम : क्षेत्रफळ 360Sq.Ft


1 फ्लॅट - लँडमार्क को ऑप हौ सोसायटी : क्षेत्रफळ 2370Sq.Ft


पत्नीच्या नावे घर 

1 फ्लॅट - शिवशक्ती भवन : क्षेत्रफळ 1090Sq.Ft


1 फ्लॅट - लँडमार्क को ऑप हौ सोसायटी : 2370Sq.Ft


घरं, गाळ्यांचा तत्कालीन बाजारभाव : 9 कोटी 45 लाख


कर्ज किती? 

एकनाथ शिंदे यांनी 2019 मध्ये आपल्या नावे 3 कोटी 74 लाखाचं कर्ज असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये TJSB चं 2 कोटी 61 लाखांचं गृहकर्ज आहे. याशिवाय श्रीमान रिअॅल्टीचं 98 लाखांच्या कर्जाचाही समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या

Kalyan Dombivli Shivsena: 'कोणता झेंडा घेऊ हाती', ठाकरे-शिंदे वादात कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक संभ्रमात  

Maharashtra Political Crisis: सातारच्या शिवसैनिकाने गाठले थेट गुवाहाटी, शिंदेंना केलं पक्षात परतण्याचं आवाहन

                         मंदीप एम गोरडवार ,मुख्य संपादक                                             (EDITOR In CHIEF)


Post a Comment

0 Comments