Header Ads Widget

Responsive Advertisement

मादगी समाजातील समाजबांधवांनी महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन "समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना" नावाची संघटना स्थापन केली. P10NEWS

 

    

     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIE
     

     मा लक्ष्मण मोहुर्ले, मा किशोर नगराळे, मा राजेश कलगट्टीवार, मा बबण गोरंतवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.


 महाराष्ट्र (चंद्रपूर ) 14 :- चंद्रपुर जिल्ह्यातील व्हि.आय.पी गेस्ट हाऊस मध्ये 14 जानेवारी रोजी शनिवारला ठिक 12 वाजताबैठक घेण्यात आली. यावेळी मा. किशोर नगराळे, मा. बबनराव गोरंतवार, मा. राजेश कलगट्टीवार, मा. शेखर बोनगीरवार, मा. धम्मराव तानादु, मा. मायाताई मोहुर्ले, मा. ज्योतीताई आसमपल्लीवार, व इतर जेष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत मा. लक्ष्मण मोहुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  या बैठकीचे उद्देश आपल्या महापुरुषांनी "जाती तोडो समाज जोडो" या विचाराने प्रेरित होऊन मादगी समाजातील बुद्धीजीवी समाजबांधवांनी आपल्या समाजातील लोकांना जातीवाचक शिवीगाळ व दलित म्हणून वारंवार अपमानीत करण्यात येतो, तरी सुद्धा आपण जातीच्या नावाने संघटना बनवून पुन्हा त्याला वाव देण्यापेक्षा महापुरुषांच्या जीवन चरित्र बहुजन विचार समोर ठेवून सन्मानपूर्वक आपल्या समाजाचे संघटनेला नाव देण्याचा मानस व  परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सर्व बैठकीतील सदस्यांनी ठरवले. त्यानुसार सर्वानुमते ठराव पारित करुन बहुमताने समाज संघटनेचे नाव मानसन्मान पुर्वक जातीचे नाव न देता " *समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना* " हे नाव ठरविण्यात आले आहे. यावेळी सर्व उपस्थित सदस्यांचे विचार व मत लक्षात घेऊन कार्यकारिणी गठित करण्यात आली.                                                          अध्यक्ष - मा. रुपेश वालकोंडे, उपाध्यक्ष - मा. विनोद बच्चलवार,  उपाध्यक्ष - विजय देवतेळे, सचिव - मा. गजानन आलेवार, सहसचिव - मा. किशोर नरुले,  कोषाध्यक्ष - मा . विनोद आसमपल्लीवार, महिला अध्यक्ष - मा. मायाताई मोहुर्ले . या सर्वांची निवड करण्यात आली.                                        

सर्वांच्या नियुक्ती विषयी संपूर्ण समाजबांधवांनी अभिनंदन केले.                                

           संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. गजानन आलेवार यांनी अतिशय खुमासदार शैलीत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. विनोद आसमपल्लीवार यांनी केले. तरुण,तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे या सभेचे वैशिष्ट्य होते. मा. राहुल गुरुदास. छत्रपती वासेकर, भावना बोलीवार, प्रविण कुमरे, पारुका कुम्रे ,मिलिंद डोंगरे,  शेखर बोनगिरवार, रंजीता बोनगिरवार, जिलेपल्लीवार, मा. विजय दुर्गाजी देवतेळे, मा. संदीप मनोहर जिलेवार, मा. जयश्री प्रमोद रामटेके, मा. गोपिका देवराव कंबलवार, मा. नागेश इटेकर, मा. प्रमोद रामटेके, मा. परमेश्वर नामदेव मोहुर्ले, तसेच चामोर्शी, वरोरा, कळमना, घुग्घुस,गडचांदुर, गडचिरोली येथुन आलेले बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                        (EDITOR IN CHIEF).                                         


           

Post a Comment

0 Comments