Header Ads Widget

Responsive Advertisement

सुरजागड लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक (CG08 AU 9084) च्या भिषण अपघातात दोघांचा मृत्यू. P10NEWS

 

 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


   भीषण अपघातात २ जण ठार तर २ जण जखमी.

      चामोर्शी (चीफ ब्युरो) दि.२५:- तहसील कार्यालय, चामोर्शी समोरील उत्तर दिशेला असलेल्या चामोर्शी ते गडचिरोली मुख्य रस्त्यावर दि.२५/०९/२०२३ रोजी दुपारी २:३० वाजता दरम्यान नरेंद्र जध्यालवार हे परीवारा सोबत चामोर्शी ला आपल्या दुचाकीवरून (MH 33 K 3135) जात होते तर सुरजागड लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक (CG08 AU 9084) गडचिरोलीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. या ट्रकच्या चुकीच्या पद्धतीने चालविण्यामुळे भरधाव वेगाने जोरदार धडक दिली.

  या भीषण अपघातात १) भावना नरेंद्र जध्यालवार वय ४५ वर्षे २)रूद्र गणेश जध्यालवार वय ५ वर्षे हे दोन जण जागीच ठार झाले. तर १) नरेंद्र जध्यालवार वय ५२ वर्षे २) प्रियंका गणेश जध्यालवार वय २४ वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत.

           अपघातात घडल्या नंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला.त्याच्यावर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

               मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         EDITOR IN CHIEF.                                           


Post a Comment

0 Comments