Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलिस व नक्षल चकमकीत एक जहाल नक्षली ठार. P10NEWS

 


गडचिरोली पोलिस व नक्षल चकमकीत एक जहाल नक्षली ठार.                                                                                  गडचिरोली, दिनांक, 01/:-  मौजा तोडगट्टा येथील        जनआंदोलनासाठी  नक्षलवाद्यांनी नागरिकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले आहे. असे नक्षलवाद्यांनी नुकत्याच टाकलेल्या पत्रकातून सिद्ध होते. हैराण झालेल्या नागरिकांना आणखी फुस लावुन आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतूने तसेच पोलिसांद्वारे राबविण्यात येणाऱ्या नक्षलविरोधी अभियान दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्यांकडून आखली जात आहे. अशा खात्रीशीर माहितीवरून गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकांच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले असता आज दिनांक 01/04/2023 च्या सकाळी 10.00 वाजेच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (जां) हद्दीतील मौजा हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे 60 ते 70 नक्षलवाद्यांनी जवानांना जिवे ठार मारण्याच्या  व हत्यार लुटण्याचा उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तिव्र स्वरूपात अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला.


 जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणांसाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे 30 ते 45 मिनिटे चालु होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.                   चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध मोहीम राबवली असता, घटनास्थळावर 01 पुरुष नक्षल मृतदेह आढळून आले. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर उर्फ साधु लिंगा मोहदा . वय 31 वर्षे रा. तुमरकोडी , पोमके कोठी , तह. भामरागड जि. गडचिरोली येथील रहिवासी होता. त्याच्यावर आज पावेतो 2 चकमक व दोन इतर असे चार गुन्हे दाखल असुन, त्यांमध्ये पोष्टे भामरागड सन 2018 साली पोलिसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुस लावणे यासाठी गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन 2014-15 साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2017 साली प्लाटुन क्र. 07 मध्ये भास्कर चा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन 2018 साली कंपनी 04 मध्ये कार्यरत होता. व त्यानंतर कंपनी 10 मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.



घटनास्थळावर 01 नग देशी बनावटीची रायफल , 01 नग भरमार रायफल , 1 नग , 303 रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या 2 मॅगझीन व 30 रांउन्डस, 8 एम. एम. रायफलचे 3 रांउन्डस, 12 बोरचे 4 राउंन्डस , 2 पिटृ, भरपूर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य , 1 सॅंमसंग कंपनीचा टॅब्लेट, 1 रेडीओ,  रोख रक्कम रुपये 38,120/- , नक्षल कपडे, व इतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलिस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-60 पथकांच्या  जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरू असुन जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलिस दलांकडून गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू असुन पुढील तपास गडचिरोली पोलिस दल करत आहे. सदर अभियान मा. पोलिस अधीक्षक श्री नीलोत्पल सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री . अनुज तारे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री यतिश देशमुख सा., यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले असुन सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलिस अधीक्षक श्री नीलोत्पल सा., यांनी कौतुक केले . तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचा संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचावण्याचे आवाहन केले आहे.

          


        

                        मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                            (EDITOR IN CHIEF).                                 


Post a Comment

0 Comments