Header Ads Widget

Responsive Advertisement

महाविकास आघाडीची नागपूर येथे विशाल सभा संपन्न.

 

     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

# नागपूर:

महाविकास आघाडीच्या पहिल्याच अधिवेशनात आपण शेतकरी कर्जमुक्ती करून दाखवली, पण या सरकारनं अवकाळी पावसाचं संकट अ‍सतांना मदत केली नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी आज पूर्व नागपूरातील नंदनवन इथल्या केडीके कॉलेजजवळील, दर्शन कॉलनीतील मैदानात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला संबोधित करतांना केला. 


आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातील प्रमुख नेते या सभेत उपस्थित होते, या सभेदरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री तसंच राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते Anil Deshmukh यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असून, १०० कोटीच्या खोट्या आरोपात त्यांना फसवलं असल्याचं म्हटलं. 


नागपूरात जनतेला २४ बाय सात पिण्याचं पाणी मिळतं असं म्हटलं जातं मात्र एक तासापेक्षाही कमी वेळ हे पाणी पुरविल जातं असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांनी केला. शेतकरी आत्महत्या, कंत्राटी कामगार या मुद्दयांवर देखील त्यांनी टीका केली.#वज्रमुठ_सभा 

#nagpur

#maharashtra

                           मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                             EDITOR IN CHIEF.                                 


                              

Post a Comment

0 Comments