Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्ह्यात 'आनंदाचा शिधा' मिळणार २.१२ लक्ष लाभार्थ्यांना. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांचा समावेश. P10NEWS

 

 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF

जिल्ह्यात 'आनंदाचा शिधा' मिळणार २.१२ लक्ष लाभार्थ्यांना.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांचा समावेश.

गडचिरोली, दि.०३ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती  निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो चणादाळ,१ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला 'आनंदाचा शिधा' (शिधाजिन्नस संच )रास्तभाव दुकानामार्फतीने सर्व पात्र शिधापत्रिकांना १०० रूपयांमध्ये वाटप करण्याचे‍ काम जिल्हयात सुरु झाले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यात ११९७ रास्त भाव दुकानांद्वारे ९८६२२ अंतोदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक व ११३४१९ प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना असे मिळून जिल्ह्यात २१२०४१ एवढ्या शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे.


त्याअन्वये प्रति शिधापत्रिका १ किलो रवा,१ किलो चणादाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा (शिधाजिन्नस संच) गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदाळा येथील रास्तभाव दुकानात 03 एप्रिल रोजी दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली, एस.एम.पतंगे पुरवठा निरीक्षक गडचिरोली व सचिन रामटेके, अका-अन्न जिल्हा पुरवठा कार्यालय, गडचिरोली यांचे हस्ते शिधाजिन्नस किटचे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. 

     


               मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                         (EDITOR IN CHIEF) 

              


Post a Comment

0 Comments