Header Ads Widget

Responsive Advertisement

कुमरगुडा येथे मधमाशा पालन प्रशिक्षण संपन्न. P10NEWS

.   मंंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

 कुमरगुडा येथे मधमाशा पालन प्रशिक्षण संपन्न.

गडचिरोली :-   महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत २०२२-२३ मध्ये मधपाळ प्रशिक्षण मौज कुमरगुडा ता. भामरागड जिल्हा गडचिरोली येथे १० लाभार्थीस १० दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण दिनांक १५ ते २४ मार्च पर्यंत घेण्यात आले. कार्यक्रमाला स्वप्नील मगदूम संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, भामरागड. अनमोल कांबळे  तहसीलदार, भामरागड तसेच भास्कर मेश्राम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली व दत्तुभाऊ येरगुडे मधमाशा पालन प्रशिक्षक इत्यादी  प्रमुख अथिती उपस्थित होते.  स्वप्नील मगदूम, संवर्ग विकास अधिकारी. यांनी अतिदुर्गम भागात कशाप्रकारे उद्योगाला चालना मिळेल या बद्दल सांगितली व श्री कांबळे साहेब  तहसीलदार यांनी  मधमाश्या पालनाचे फायदे व त्यापासून निर्माण होणारे रोजगार यांची माहिती दिली श्री भास्कर मेश्राम जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी मंडळाचे  विविध योजनाबद्दल माहिती दिली व प्रशिक्षक दत्तुभाऊ येरगुडे यांनी मधमाशा पालणा बद्दल माहिती  दिली. तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाचे इतर कर्मचारी श्री लखन गेडाम, श्री शैलेश गोतमारे व श्री हर्षल हुमणे उपस्थित होते.

                             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                           EDITOR IN CHIEF.                                      


Post a Comment

0 Comments