Header Ads Widget

Responsive Advertisement

एकाच अर्जद्वारे कृषि योजनांचा मिळतोय लाभ "अर्ज एक योजना अनेक". P10NEWS

 

     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

   एकाच अर्जद्वारे कृषि योजनांचा मिळतोय लाभ 

    "अर्ज एक योजना अनेक"

   महा-डीबीटीद्वारे जिल्हयात 20.77 कोटी रूपयांचे अनुदान  वितरीत.


मागील दोन वर्षात गडचिरोली जिल्हयातील 1800 शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलद्वारे 20.77 कोटी रूपयांचे अनुदान मिळविले. गडचिरोली जिल्हयात आधुनिक शेती व नगदी पिकांसाठी शेतकरी जोमाने काम करीत असल्याचे यावरून दिसून येते आहे.  शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पध्दतीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच खिडकीद्वारे पोर्टलच्या सहाय्यातून मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-डीबीटी हे संकेतस्थळ विकसीत केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हयातील जवळपास आठराशे शेतकऱ्यांना सन 2021-22 व 2022-23 मधे 20,77,94,044 रूपये एवढे अनुदान देण्यात आले आहे.महा-डीबीटी हे एकात्मिक संगणक प्रणाली असून एक खिडकी योजनाच आहे. यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि एकसूत्रता आली आहे. महा-डीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळे खोदकाम, शेडनेट योजना, पॉलीहाउस, पॅक हाऊस, कांदाचाळ व शेततळे अस्तरीकरण या घटकांसाठी अनुदानाची सुविधा आहे. या व्यतिरीक्त ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, नांगर, खते व बियाणे पेरणी यंत्र, पाचट कुट्टी, मल्चर, श्रेडर, ट्रॅक्टर ऑपरेटेड ब्लोअर, धान्य मळणी यंत्र, डाळ मिल, कंम्बाईन हार्वेस्टर, इनफिल्डर, प्लास्टीक पेपर मल्चींग, कोल्ड स्टोरेज, रायपनिंग चेंबर व प्रक्रिया युनिट आदी घटकांसाठीही शंतकऱ्यांना अर्ज करता येतो.


            शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या सहाय्याने सदर लाभ एका अर्जद्वारे महाडीबीटी पोर्टलद्वारे वितरीत केला जातो. यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजना (सामुहिक/वैयक्तिक), डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य, पौष्टीक तृणधान्य व तांदूळ, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजनेत- कषि यांत्रिकीकरण, कांदा साठवणूक सुविधा, शेततळ्यांना कागदी आच्छादन, संरक्षित लागवड, भाजीपाला रोपवाटीका, अनुसूचित घटकासाठी नवीन विहीर इत्यादी, राज्य कृषि यांत्रिकीकरण, उप योजना कृषि यांत्रिकीकरण तेलबिया लागवडीत वाढ करणे इत्यादी.


*असा करा अर्ज* – शेतकऱ्यांनी वरील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरून स्वत:च्या मोबाईलवरून, संगणक अथवा सामुदायिक सुविधा केंद्रावरून तसेच ग्रामपंचायत संग्राम कक्षामधून अर्ज करावा. नंतर तालुक्यातील तसेच जिल्हयातील सर्व अर्जाची सोडत काढण्यात येते. संगणक सोडतीत निवड झालेल्या शंतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मोबाईलवर लघु संदेशाद्वारे कळविले जाते. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना महा-डीबीटी पोर्टलवर पुर्वसंमती देण्यात येते. पुर्वसंमतीमधे सुचीत केलेल्या कालावधीत निवड झालेल्या बाबींची शेतकऱ्यांना बाजारपेठेतून आपल्या पसंतीच्या उत्पादकाच्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून देयकाची छायांकित प्रत महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करायची आहे. यानंतर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते.


* गडचिरोली जिल्ह्यात आज अखेर विशेष.

* ट्रॅक्टर -३९३ - ५ कोटी रु.

* औजारे - २८५ - १.८८ कोटी रु.

* सिंचन सुविधा विहिरी व शेततळे - ७०० - ९ कोटी रु.

* कांबाइन हार्वेस्टर- १४ - १.५ कोटी रुपये.

गेल्या १० वर्षात पहिल्या फलोत्पादन योजनेवर १ कोटी पेक्षा जास्त खर्च गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात फळबाग योजनेत काजू लागवडीचे विशेष पीक घेण्यात आले आहे.

                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          EDITOR IN CHIEF.                                          


Post a Comment

0 Comments