मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
अखेर वाघिणीला जेरबंद करण्यास गडचिरोली वनविभाग व पोलिस पथक यशस्वी !
गडचिरोली व चंद्रपूर रोडलगत कृषी आत्मा केंद्र व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे वाघिणीने तळ ठोकुन बसली होती.
गडचिरोली :- गडचिरोली वनविभाग व पोलिस प्रशासनास कृषी आत्मा केंद्र व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे वाघिण असल्याची माहिती मिळताच सकाळी अंदाजे 09.00 वाजता पासुन वाघिणीला जेरबंद करण्याचे सर्थीचे प्रयत्न सुरू झाले. व यादरम्यान गडचिरोली शहरातील नागरिकांनी वाघिणीला पाहण्याची गर्दी केली.
गडचिरोली वनविभाग व पोलिस प्रशासन वाघिणीला जेरबंद करण्याचा थरार नाट्य अखेर सायंकाळी 05:00 वाजताच्या दरम्यान वाघिणीला पकडण्यास यश प्राप्त झाले. परंतु सकाळपासून वाघिणीला पाहण्याची गर्दी केलेल्या नागरिकाची नाराजी झाली. गडचिरोली वनविभाग व पोलिस प्रशासनाने वाघिणीला बंद पिंजऱ्यात घेऊन गेल्यामुळे नाराजी व्यक्त केली. परंतु एकीकडे वाघिणीला जेरबंद केल्याचा आनंद व्यक्त केला आणी प्रशासनाच्या दिवसभराच्या वर्दीचा प्रयत्नाचे कौतुक नागरिकांनी केली. आणि कृषी आत्मा केंद्र व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथील कर्मचार्यांनी वाघिण जेरबंद होताच सुटका झाल्याचं फटका फोडुन आनंद व्यक्त केले.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. ( EDITOR IN CHIEF).
0 Comments