Header Ads Widget

Responsive Advertisement

संविधानाने दिला समानतेचा हक्क ! पण बल्लारपूर प्रशासन व भुमाफियांनी बोगस दस्तावेज तयार करुन २२ मादगी समाजातील लोकांची जमिन हडपुन त्यांना पुन्हा भुमिहीन करण्याचा पाप केला. P10NEWS

             

    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


     संविधानाने दिला समानतेचा हक्क ! पण बल्लारपूर प्रशासन व भुमाफियांनी बोगस दस्तावेज तयार करुन २२    मादगी समाजातील लोकांची जमिन विक्री करून त्यांना पुन्हा भुमिहीन करण्याचा पाप केला.      


      चंद्रपूर :-  जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील 22 व्यक्तींना बल्लारपूर तहसील कार्यालयातुन तहसीलदारांचे पत्र प्राप्त झाले की शासनाने वाटप केलेली जमीन आपण परस्पर कशी विक्री केली ? तेव्हा या 22 व्यक्तींनी तहसिल कार्यालयात माहिती काढली असता यांच्या पूर्वजांना प्रत्येकी 4 एकर जमीन 1975 मध्ये वाटप करण्यात आली होती त्याजागेची या व्यक्तींनी महसुल विभागामधून माहिती काढली असता त्या जमिनीवर दुसऱ्या व्यक्तींचा कब्जा असून घरे बांधण्यात आली आहे, त्या जमीनी अकृषक करून भूमाफियांनी विक्री केल्याची बाब पुढे आली आणि माहिती अधिकारात माहिती मागवली असता अपूर्ण माहिती मिळाल्याचा आरोप आज आयोजित पत्रपरिषदेत पीडित प्रेमसागर शामराव अरपिल्ला, अन्नू उर्फ आनंदराव मातंगी, संतोषकुमार शेंडमाके, नितीन सोयाम, रंगय्या अद्दूरवार, तिरुपती पुल्लूरवार यांनी केला आहे.

भारत आणि चीन चे 1962 मध्ये युद्ध यात मोठ्या प्रमाणात महार बटालियन चे सैन्य शहीद झाले होते त्यामुळे शासनाने चर्म व्यवसाय करणारे, मादगी व इतर भूमिहीन लोकांना प्रत्येकी 4 एकर जमिनी देण्यात आल्या होत्या. त्याकाळी हा वर्ग शिक्षित नसल्याने यांचेकडे जमिनीचे कुठलेही कागदपत्रे नाही त्यानंतर आज 53-54 वर्षानंतर त्यांच्या वारसांना बल्लारपूर तहसीलदार यांचे तुम्ही जमीन का विक्री केली असे पत्र प्राप्त झाले. त्यावरून तहसिल व महसूल विभागातुन माहीती काढली असता या 22 लोकांची गोरक्षण वार्ड बल्लारपूर येथील सर्वे क्रमांक 31 / मधील 594 हेक्टर आर जमीन या सर्व जमिनी श्री. महागु सोमा, श्री. दुडापाक रायमल्लु येल्लय्या, श्री जोगु राजय राजय, श्री. कलवल लिंगा राजम, श्री. भिमराव लिंगा व इतर, श्री. दासर व्यकंटी/लांम्बे, श्री. कलवल कनकय्या राजम, श्री. रंगय्या नरसय्या अडूरवार, श्री. अडूर नर्सय्या, दुडापाका रायमल्लु, रामा वल्द दसरु गोंड, इसरा फकरा गॉड, राजय्या पोचय्या साटला, श्री. फुल्लुर बालय्या मुतय्या, श्री. समय्या बुच्चया दुर्गे, श्री. गंगय्या पोचम, श्री. जोगु येल्लय्या राजम, श्री. कवडू डोमा चुनारकर, श्री. पोचु राजु मावलीकर, श्री. रामा वल्द दसरु गोंड, श्री. समलु बुचम दुर्गे यांच्या नावे वाटप करण्यात आलेल्या जमिनी कोणतेही पत्रव्यहार न करता भूमाफियांनी परस्पर विक्री करण्याची धक्कादायक बाब पुढे आली.

चर्म व्यवसाय करणा-या भुमिहीन मादगी व इतर समाजाच्या लाभार्थीना जी जमिनी शासनानी वाटपात दिलेली आहे त्या जमिनी खरेदी विक्री किंवा अकृषित करु नये असे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ मधिल कलम ४२ मध्ये तरतुद असताना ही अवैधरित्या खरेदी विक्री किंवा अकृषिक कोणत्या नियमान्वये करण्यात येत आहे व हे सर्व कोण अधिकारी व कर्मचारी करत आहेत यांची आपण तत्काळ आपल्या स्तरावर चौकश करुन दोषी असणा-या आपल्या कर्मचा-या विरुध्द न्यायोचीत कार्यवाही करून त्या जमिनी शासनाने चर्म व्यवसाय करणा-या भुमिहीन मादगी व इतर समाजाच्या लाभार्थीना दिलेल्या आहेत त्यासर्व जमिनी तात्काळ परत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना देऊन त्या आदेशाची एक प्रत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हाला देण्यात यावे अशी मागणी केली.

सर्व खरेदी विक्री आकृषक कसे होत आहे ? व याचेकडे महसुल विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे आजपर्यंत लक्ष का नाही ? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे व होत आहे तरी जातीने लक्ष देऊन तत्काळ हे सर्व प्रकरण हाताळुन योग्य चौकशी करुन दोषी आढळणा-या भ्रष्ट अधिका-याविरुध्द न्यायोचित कारवाई ३० मार्च पर्यत करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हाला दयावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

अन्यथा प्रशासना विरुध्द रस्त्यावर येऊन आदोंलनाचा मार्ग पत्करावा लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा ही यावेळी देण्यात आला.

                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                      (EDITOR IN CHIEF).                                   


                            

Post a Comment

0 Comments