Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्ह्यातील बाल संगोपन योजनेचे प्रस्ताव आता तालुक्याच्या ठिकाणीच - जिल्हाधिकारी यांचे निर्देश. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

गडचिरोली जिल्ह्यातील बाल संगोपन योजनेचे प्रस्ताव आता तालुक्याच्या ठिकाणीच - जिल्हाधिकारी यांचे निर्देश.

ग्रामीण भागातील महिलांची पायपीट थांबणार.

 गडचिरोली/ दि.24:  महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2013, 6 एप्रिल 2021 नुसार 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त एचआयव्ही, सिकलसेल, बाधीत बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदयाची बालके, इत्यादी JJ Act नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत जिल्हयातील बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्हयातुन लाभार्थी बालके हे जिल्हास्तरीय कार्यालयात येत असतात त्यामुळे आपल्या जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र तसेच वाहतुकीचे

साधने, जिल्हयाचे क्षेत्रफळ याचा विचार करता लाभार्थ्यांना जिल्हा स्तरीय कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात अनेक अडचणी निर्माण होतांना निर्दशनास आले होते. 


       सदर लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये या दुष्टीने संजय मिना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा बाल संरक्षण समीतीची त्रैमासिक आढावा बैठक दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत जिल्हाधिकारी यांनी बालसंगोपन योजनेचा प्रस्ताव जिल्हास्तराव न घेता तालुकास्तरावर तालुका बाल संरक्षण समिती मार्फत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यायचे असल्यास दिनांक 1 डिसेबर 2022 पासून जिल्हास्तरीय कार्यालयात प्रस्ताव सादर न करता तालुक्याच्या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे सादर करण्यात यावे. हि योजना विनामूल्य असून कुठल्याही फी किंवा मध्यस्थांची आवश्यकता नाही या योजनेबाबत काही अडचणी असल्यास किंवा सदर योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता कोणीही पैशाची मागणी करीत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली या कार्यालयास दुरध्वनी क्रमांक -07132222645 यावर किंवा ई मेल आयडी- dcpu.gadchiroli@gmail.com यावर संपर्क साधावा. 

    बाल संगोपन योजनेकरीता लागणारे आवश्यक कागदपत्रे:- विहीत नमुन्यातील अर्ज,पालक व बालकासह घरासमोरील पोस्ट कार्ड आकाराचा 1 फोटो,पालकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र,चालु वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार),पालकाचे आधार कार्ड,बालकाचे आधार कार्ड,पालकाचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक,बालकाचा जन्माचा दाखला,बालकाचा चालु वर्षाचा बोनाफाईड प्रमाणपत्र,पालकाचा मूत्युचा दाखला,पालक कारागृहात असल्यबाबतचे प्रमाणपत्र (लागु असेल तर),पालक HIV ग्रस्त असल्यास प्रमाणपत्र (लागु असेल तर),सिकलसेल असल्यास प्रमाणपत्र ((लागु असेल तर),

 विशेष सुचना:- वरिल सर्व कागदपत्रे याची 1 मुळ प्रत व 1 छायांकीत झेराक्स प्रत अशा एकुण 2 नस्ती/फाईल तयार करुन 2 फाईल मध्ये लावण्यात यावे व सादर करण्यात यावे. असे आवाहन प्रकाश भांदककर  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       EDITOR IN CHIEF 

                     



Post a Comment

0 Comments