Header Ads Widget

Responsive Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - चंद्रपूरात सोन्याच्या दोन खाणी आढळल्या. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.*                         *चंद्रपूरात सोन्याच्या दोन खाणी आढळल्या.*             - महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिझरी आणि बामणी या भागात सोन्याच्या दोन खाणी आढळून आल्या आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रपुर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कोळसाच्या खाणी आहेत.त्यानंतर आता भुगर्भात तांबे आणि सोन्याच्या खाणी आहेत. केन्द्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागाकडून देण्यात आली आहे.त्यादुष्ट्रीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहिती आहे.राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात दिले होते.राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करुन या व्यवसायातील अडचणी दूर  करुन राज्याच्या महसुलात वाढ झाली पाहिजे. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट  केले आहे. राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असुन गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा प्रकल्प सुरू करु शकतो. अशा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.                     


  *संशोधनासाठी लिलाव प्रक्रिया.*                               चंद्रपूर  जिल्ह्यात सोन्याची खाण  हा विषय प्राथमिक अवस्थेत आहे.सिंदेवाही तालुक्यातील मिझरी आणि बामणी येथे सोन्याचे अंश आढळले.राज्यशासनाच्या भुविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय नागपूर तर्फे लिलाव प्रक्रिया करून संशोधन केले जाणार आहे. या संशोधनात तेथे खाण उघडल्यास ती व्यवहारिक दृष्टया परवडणारी असेल तरचं पुर्वसर्वेक्षणानंतर खाण पट्टा मंजुर होईल.जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने हे कार्य होईल. - *गजानन कामडे, वरिष्ठ भु वैज्ञानिक*
 


                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                         

                         EDITOR IN CHIEF.   

                 



Post a Comment

0 Comments