Header Ads Widget

Responsive Advertisement

आधार कार्ड नसल्याने डॉक्टरांनी गर्भवतीला पाठवले परत...अन् दोघांचीही मृत्यू P10NEWS

 आधार कार्ड नसल्याने डॉक्टरांनी गर्भवतीला पाठवले परत...अन्  

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

    दिनांक :04-Nov-2022 

      

तुमकुरू, 

pregnant woman कर्नाटकमध्ये डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा आणि तिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तुमकुरू जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, आधार किंवा प्रसूती कार्ड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करण्यास नकार दिला, ज्यामुळे प्रसूतीदरम्यान महिला आणि तिच्या दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला. कस्तुरी असे मृत महिलेचे नाव असल्याचे महिलेच्या शेजाऱ्यांनी सांगितले.

 

भारतीनगर येथील एका घरात ती तिच्या मुलीसोबत राहत होती. महिलेचा पती दुसरीकडे राहत होता. असे सांगण्यात आले की, महिलेला प्रसूती वेदना होत असताना शेजाऱ्यांनी तिला ऑटोरिक्षातून तुमकुरू जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, आधार आणि प्रसूती कार्ड न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाने महिलेला pregnant woman दाखल करण्यास नकार देत तिला घरी पाठवले. शेजाऱ्यांनी सांगितले की, घरी परतल्यानंतर कस्तुरीच्या प्रसूती वेदना तीव्र झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, दुसऱ्या मुलाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर काही वेळातच तिच्या पहिल्या मुलाचाही मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी सांगितले, कस्तुरीला सहा वर्षांची मुलगीही आहे. 

                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                           EDITOR IN CHIEF

                           Post a Comment

0 Comments