Header Ads Widget

Responsive Advertisement

भारतीय संविधानामुळे भुमिकन्या राष्ट्रपती. - P10NEWS 

              बैदापोसी ओडिशासारख्या राज्यातील मधुरभंज जिल्ह्यातील एका लहानशा गावात संथाल आदिवासी समाजात जन्माला आलेल्या द्रोपदी मुर्मू यांची उमेदवारी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केली.तेव्हाच भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती होणार हे स्पष्ट होते.संसंद भवनात झालेल्या मतमोजणीत त्या विजयी झाल्या.देशातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार या सर्वोच्च पदावर विराजमान होणा-या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महीला राष्ट्रपती ठरल्या आहेत.हा या देशातील  संविधानाचा व लोकशाहीचा विजय आहे.राष्ट्रपत्ती होण्यामागे त्यांचे कर्तृत्व श्रेष्ठ ठरलेले आहे.आदिवासी समाजापुढे असलेल्या अनेक प्रतिकुल गोष्टींमुळे शिक्षणाची आस धरली.आणि पुढे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिला तसेच आदिवासी यांचे प्रश्न सोडविण्याचे कामही मोठ्या जिद्दीने केले.

       सन 2014 मध्ये भाजपने दिल्ली काबीज केल्यानंतर मुर्मु यांची झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.तोपावेतो  या आदिवासी राज्यात एकाही राज्यपालाने आपली पाच वर्षाची मुद्दत पुर्ण केलेले नव्हते.मात्र मुर्मु या सलग सहा वर्षे राज्यपालपदी राहील्या आणि त्यांनी राज्यपाल पदावरून आदिवासींच्या हिताचे संरक्षण करणारे अनेक निर्णय घेतले.सर्वोच्च घटनात्मक पदावर काम करताना त्या या पदाला पुर्ण न्याय देतील.असा विश्वास वाटतो. 

       द्रोपदी मुर्मु राष्ट्रपती झाल्याने भारत देशातील सर्व आदिवासींना "न भूतो न भविष्यतो असा चमत्कार झाला. द्रौपदी यांचा विवाह श्याम चरण मुर्मु यांच्याशी झाला.त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती.लग्नानंतर काही दिवसांनी त्यांचे पती आणि दोन मुले मरण पावले.ना त्यानंतर त्यांनी आपल्या घरी आश्रमशाळा काढून शिक्षकांचे काम करुन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले.शिक्षकानंतर त्यांनी ओडीशाच्या सिंचाई विभागात कनिष्ठ सहाय्यक बाबु म्हणून काम केले.

    त्या पगारातून त्यांनी आपला घर खर्च चालविला आणि मुलगी इति मुर्मु हिला शिक्षण दिले.मुलीने कॉलेजच्या शिक्षणानंतर बैंकेत नौकरी मिळवली.इति मुर्मु रांची मध्ये राहते.इति मुर्मु यांचा विवाह झारखंड मधील गणेश या मुलांशी लग्न झालेला आहे.त्यांची मुलगी आद्दाश्री आहे.अशा या महामहीम राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांचा आपल्या सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे.

                                          लेख

                                      निवास कोडाप,

                                      गडचिरोली

                            


Post a Comment

0 Comments