Header Ads Widget

Responsive Advertisement

भामरागड वनविभागमधुन एका वनरक्षकांची मुलांच्या शैक्षणिक कारणावरून चौडम्पल्ली येथे बदली केल्याने पदस्थापनेवरुन वनकर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.(मग इतर कर्मचार्यांना न्याय मिळेल काय? शैक्षणिक विनंतीवरून बाकींच्याना बदली मिळेल काय,सवाल?) P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

भामरागड वनविभागमधुन एका वनरक्षकांची मुलांच्या शैक्षणिक कारणावरून चौडम्पल्ली येथे बदली केल्याने पदस्थापनेवरुन वनकर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.(मग इतर कर्मचार्यांना न्याय मिळेल काय? शैक्षणिक विनंतीवरून बाकींच्याना बदली मिळेल काय,सवाल?)

गडचिरोली/आलापल्ली, दिनांक-30:-सदर पदस्थपणेबाबत मा.आर एस मडावी यांची पदोन्नतीने पदस्थापणा भामरागढ वनविभागात झाली त्यानंतर पहिल्या आदेशात बदल करून पुन्हा त्यांची पदस्थापणा वन्यजीव आलपल्ली वनविभागात झाल्याने आश्चर्य होत आहे.सदर व्यक्ती 2004 पासून वनरक्षक या पदावर सलग 19 वर्षे आलपल्ली वनविभागात कार्यरत होते.त्यांचे मुळगाव सुद्धा आलापल्लीच आहे.ते आलपल्ली परिक्षेत्रातील नेन्डेर बीटावर 5 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असताना(यांचे कडे  सिरेपल्ली नियतक्षेत्राचा दोन वर्षे अतिरिक्त कार्यभार होता हे विशेष) त्यांची पदोन्नतीने भामरागड वनविभागातील गटा परिक्षेत्रातील तोडगट्ट उपक्षेत्रात पदस्थपणा करण्यात आली. मुलांच्या शैक्षणिक कारणास्तव त्यांच्या बदलीत अंशतः बदल करून चौडमपल्ली येथे करण्यात आली

    त्यांना 1 मुलगा व 1 मुलगी असून त्यांचे दोन्ही पाल्य आलपल्ली येथे राहून शिक्षण घेत आहेत.चौडमपल्ली हे ठिकाण आलापल्लीपासून 35km दूर आहे. आणि आधी पदस्थापणा झालेलं ठिकाण गटटा परिक्षेत्र येथील कर्मचारी आलापल्लीतुनच ये-जा करतात. पदोन्नतीच्या पहिल्या पदस्थापनेच्या ठिकाणाहून स्वगावी राहूनच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता आले असते. परंतु चौडम्पल्ली हे वन्यजीव उपक्षेत्र असल्याने त्यांना मुख्यालयी राहावे लागेल. तेव्हा त्यांच्या पाल्यांचे शिक्षणाच्या विनंतीवर बदली चौडम्पल्ली येथे करणे अनाकलनीय आहे. आणि त्यांना भामरागड वनविभागात काम करण्याची मुळीच इच्छा नाही.हे ही यामुळे दिसून येते.






(नागपूर येथे मानेवाडा रोड ला 2 bhk flat only 55 lakh rupees, farnichar free .co.mo.no.:-8459508894)
                                                                                         जर प्रशासनाला कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्यांजवळ राहून शिक्षण देणे आवश्यक वाटत असेल तर ही बाब सर्वच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत का नाही ?(विशेषतः भामरागड, सिरोंचा, कोरची, एटापल्ली, मुरूमगाव, मालेवाडा, पेंढरी इत्यादी)असा प्रश्न निर्माण होतो.

    या बदल केलेल्या पदस्थापणेमुळे वनकर्मचाऱ्यामधे असंतोष निर्माण होत आहे आणि इतर कर्मचारी सुद्धा अशी मागणी करतील. तर सगळ्यांना न्याय मिळेल का?

          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments