Header Ads Widget

Responsive Advertisement

शेतकऱ्यांना पिक विम्याची मुदतवाढ द्यावी.(जंगल भागात नेटवर्क नाही, मुसळधार पाऊस,पुरग्रस्त, रोवणी काम व्यस्ततेमुळे)विम्यापासुन शेतकरी वंचित राहू नये -बसपा जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट गडचिरोली यांनी केली. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


    शेतकरी पिक विम्यापासुन वंचित राहू नये, याकरिता मुदतवाढ देण्याची मागणी-बसपा जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट गडचिरोली यांनी केली.

गडचिरोली/दिनांक,३०:-गडचिरोली जिल्याचे बसपा जिल्हाध्यक्ष श्री. शंकर बोरकुट यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी 31 जुलै ला मुदत संपणार आहे , मुदतवाढ देण्याची मागणी केली.मुदतवाढ न मिळाल्यास अनेक शेतकरी पिक विम्यापासुन वंचित राहावे लागणार आहे.कारण गडचिरोली जिल्ह्यात जंगली भाग असल्याने नेटवर्क नियमित राहात नाही.आणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली होती.आणी पिक विम्याच्या वेळेत शेतकऱ्यांचा भात रोवणी चे काम चालू होते.यामुळे शेतकरी पिक विमा काढु शकले नाही.करिता पिक विम्याची मुदतवाढ देण्यात यावी.जेणेकरुन शेतकरी वंचित राहणार नाही.अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट व इतर पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली.

             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                           (EDITOR IN CHIEF)


          

Post a Comment

0 Comments