Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण सोडत काढणे, प्रारुप प्रसिद्ध करने,हरकती व सूचना सादर करण्याचे कार्यक्रम जाहीर p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

 

*जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्याकरीता*

*सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सुचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर*


*गडचिरोली, दि.06* : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 12 उपकलम(१), कलम 58(१)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सुचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांची  सभा दि.13 जुलै 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. आरक्षणाचे प्रारूप दि.15 जुलै रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी दि. 15/07/2022 ते 21/07/2022 असणार आहे.


जिल्हा परिषद, गडचिरोली सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी दु. 3.00 वा. असून सभेचे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीचे परिसरातील जिल्हा नियोजन समितीचे नविन सभागृह आहे. पंचायत समिती, कोरची सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी स. 11.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, कोरची आहे. पंचायत समिती, कुरखेडा सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी दु. 3.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, तहसिल कार्यालय, कुरखेडा आहे. पंचायत समिती, देसाईगंज सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी स. 11.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, देसाईगंज आहे. पंचायत समिती, आरमोरी सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी दु.3.00 वा. असून सभेचे ठिकाण तहसिल कार्यालय, आरमोरी नविन प्रशासकीय ईमारत येथील सभागृह आहे. पंचायत समिती, धानोरा सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी स. 11.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, तहसिल कार्यालय, धानोरा आहे. पंचायत समिती, गडचिरोली सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी दु. 3.00 वा. असून सभेचे ठिकाण गोंडवाना कला केंद्र, पोटेगाव रोड, गडचिरोली आहे. पंचायत समिती, चामोर्शी सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी दु. 3.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, चामोर्शी आहे. पंचायत समिती, मुलचेरा सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी स. 11.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, मुलचेरा आहे. पंचायत समिती, एटापल्ली सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी दु. 3.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, एटापल्ली आहे. पंचायत समिती, भामरागड सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी स. 11.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, भामरागड आहे. पंचायत समिती, अहेरी सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी स. 11.00 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, अहेरी आहे. पंचायत समिती, सिरोंचा सभेची वेळ व तारीख दि. 13/07/2022 रोजी दु. 3.30 वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, सिरोंचा आहे.

                  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                    (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments