Header Ads Widget

Responsive Advertisement

100 कोटी द्या.कॅबिनेट मंत्री पद घ्या! तीन आमदारांना फसवु पाहणा-या चार आरोपींना अटक P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
 

Maharashtra: मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी

By- P10NEWS

Published:20th Jul, 2022 at 1:48 PM

Maharashtra: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होऊन १५ दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवण्या साठी अनेक आमदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. त्यातच आता एक टोळी सक्रीय झाली असून आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली जात आहे.



आमदारांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. रियाझ शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जफर उस्मानी अशी त्यांची नावे आहेत. या चारही आरोपींना 26 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आमदाराकडून 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या टोळीतील रियाज शेखने 17 जुलै रोजी दुपारी 12.12 वाजता एका आमदाराच्या सचिवाला फोन केला की, मी दिल्लीहून आलो आहे, असे सांगून माझी आज 4 वाजता आमदारांसोबत बैठक आहे, मात्र आमदार फोन उचलत नाहीत. त्यावर सचिवांनी रियाजचा निरोप आमदारांना पाठवला, मात्र आमदारांनी त्याला उत्तर दिले नाही.


Also read:

Shiv sena: शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार

रियाझने पुन्हा 4.06 वाजता सचिवांना फोन केला आणि सांगितले की मी अजूनही 4 वाजताच्या बैठकीसाठी आमदारांची वाट पाहत आहे. त्यानंतर सचिवांमार्फत आमदारांना पुन्हा निरोप पाठवला, मात्र

आमदारांना पुन्हा निरोप पाठवला, मात्र आमदाराकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये आमदारांची बैठक आधीच निश्चित करण्यात आली होती कारण सचिवांनी आमदारांची एक दिवस आधी म्हणजे 16 जुलै रोजी रात्री 9 वाजता आकाशवाणी भवनाजवळील आमदार निवासात भेट घेतली होती.

त्यानंतर आरोपीचा वारंवार फोन येत असल्याने आमदारांनी 17 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता रियाजला सचिवामार्फत संबंधित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.

Also read:

Maharashtra: हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे बँकेत चोरी

रियाझ आणि आमदार यांची तेथे खुपवेळ बैठक झाली. या बैठकत रियाझने 90 कोटी रुपयांचा सौदा निश्चित केला, परंतु 18 कोटी रुपये आगाऊ मागितले. यानंतर आमदारांनी रियाजला दुसऱ्या दिवसापर्यंत थांबण्यास सांगितले आणि हा प्रकार आमदारांनी त्यांच्या खासगी सचिवाला सांगितला. यानंतर रियाजला आमदाराने १८ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉइंट परिसरात बोलावले आणि ही माहितजुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉइंट परिसरात बोलावले आणि ही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षालाही देण्यात आली.

रियाझ ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचला, तेथून आमदार त्याला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. काही चर्चेनंतर तेथे साध्या गणवेशात उपस्थित असलेल्या क्राइम ब्रँचच्या जवानांनी रियाज शेखला अटक केली. यानंतर अन्य तीन गुंडांना अटक करण्यात आले. आरोपींकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅप चॅट आणि त्यांच्या मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉइंट परिसरात बोलावले आणि ही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षालाही देण्यात आली.

                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                             (EDITOR IN CHIEF)



Post a Comment

0 Comments