Header Ads Widget

Responsive Advertisement

आंतरराष्ट्रीय जागतिक ऑलिंपिक दिनाचे आयोजन p10news

मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

 आंतरराष्ट्रीय जागतिक ऑलिंपिक दिनाचे आयोजन

गडचिरोली/दि.22: दि. 23 जून 1894 साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली या दिवसाच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली तर्फे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व प्रवृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस दि. 23/06/2022 गुरुवार रोजी सायंकाळी 05.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांस्कृतीक भवन, गडचिराली येथे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी खेळाडूंचा सत्कार, रॅली इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून जास्तीत जास्त खेळाडू व नागरीकांनी या प्रसंगी उपस्थित राहावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

****


Post a Comment

0 Comments