Header Ads Widget

Responsive Advertisement

गंगावाडी वाळु घाट प्रकरण ; सरपंच तत्कालीन ग्रामसेवकाविरोध्द कारवाईचे जिल्हाधिका-याचे आदेश p10news

 

मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

गेवराई(दि.22जून):- तालुक्यातील गंगावाडी येथील वाळूघाट तक्रारी संदर्भात नेमलेल्या चौकशी समिती गंगावाडीचे सरपंच व तात्कालीन ग्रामसेवक यांनी अनाधिकृतपणे काम केले असल्याचे स्पष्ट केले आहे. घाटासाठी ग्रामसभा व मासिक सभा रजिस्टरवर नोंद नसल्याने चौकशी समोर आले आहे त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वाळुघाट लिलाव संदर्भातील ठरावाबाबत दोषीवर कारवाई करून अहवाल 27 जुन पर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहे गंगावाडी वाळू घाट लिलाव दिलेल्या ठराव ग्रामसभेत झाला नव्हता गोदापात्रात पाणी असताना वाळू घाटाचा लिलाव झाला प्रश्न उपस्थित करून याची चौकशी करण्याचे मागणी गंगावाडी येथील ग्रामस्थांनी आंदोलनात केली होती.


त्यांना त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीच्या तक्रारीची चौकशी केली असता वेगवेगळ्या बाबी समोर आल्या 15 जून 2022 रोजी ग्रामसभा व मासिक सभा झाल्याची नोंद रजिस्टरला नव्हती तसेच कोणतीही ठराव झाला नव्हता मंजूरीवर खोटी स्वाक्षरी केल्याचे ग्रामसेवकाचे ही लेखी अजमावत नमूद केले आहे या दरम्यान सरपंच भास्कर हातागळे त्यांचे जवाबात म्हटले आहे की ग्रामपंचायत साठी 50 लाख रुपयांचा निधी आपल्याला मिळणार आहे असल्याचे दुर्वेश यादव यांच्या सांगण्यावरून ठरावावर स्वाक्षरी केली आहे ठराव तात्कालिक ग्रामसेवक यांच्याकडे होता मी सरपंच पदाचा पदभार घेतला असल्याचे मला कामाचा अनुभव नव्हता दबावापोटी स्वाक्षरी केले ग्रामसेवक 15 जून 2019 रोजी पदाचा पदभार गंगवाडी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक पदाचा पदभार तात्काळ ग्रामसेवक व सरपंच हातागळे यांची यांनी प्रकरणात पायाभूत परिसर चौकशी करणे योग्य होईल समितीचे एकमत झाले त्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा माजी जिल्हा परीषद संबंधिसं कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदचे सी ई ओ यांना दिले आहेत व अहवाल सादर करण्यास कळवले आहे.


हे… काय आहे प्रकरण ?

———————————-

गंगावाडी येथील वाळू घाटा ऐवजी ठेकेदाराने गट नंबर सोडून धोबी घाटावरून वाळुउपसा करीत असल्याचा आरोप करत 31 मे रोजी ग्रामपंचायतीने ठराव घेत हा वाळु उपसा व हा वाळु घाट बंद करण्याचा निर्णय घेतला वाळु उपसा सुरूच राहिल्याने पुन्हा गेवराईचे कार्य सम्राट आमदार अॅड. लक्ष्मण आण्णा पवार यांच्यासह तमाम ग्रामस्थांनी गंगावाडी गोदावरीच्या नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले या अंदोलनाची दखल घेत बिडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी – राधाबिनोद शर्मा साहेबांनी आंदोलकांची भेट घेतली त्यानंतर समिती स्थापन करून चौकशी अंती निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बिडचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती त्या चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सीईओ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


अखेर पितळ उघडे पडले

—————————–

गंगावाडी वाळु घाट सुरू होऊच नये यासाठी ग्रामस्थांची पहिल्या पासुन भुमिका असतांना देखील वाळुघाट सुरू झाला सरपंच यांच्या स्वाक्षरीने हा ठराव गेला असून या प्रकरणात सरपंचाविषयी संशयित भुमिका असलेल्याने गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार ॲड.लक्ष्मण आण्णा पवार व ग्रामस्थांना वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करावी लागली तेव्हा बडा मासा सरपंचांच्या रूपाने जाळ्यात अडकू लागला अन् अखेर पितळ उघडे पडले.

Post a Comment

0 Comments