Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या महीला महारोजगार मेळाव्यात मा.सुप्रियाताई सुळे खासदार यांची उपस्थिती p10news

मंदीप एम. गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य  महिला महारोजगार मेळावागडचिरोली/07:- गडचिरोली जिल्हा हा अतिदर्गम नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व उद्योगविरहीत जिल्हा असून अजूनही येथील आदिवासी बांधव पारंपारीक शेती व्यवसाय करीत आहेत. शेती व्यवसायाव्यतीरिक्त कुठल्याही उद्योगाचे कौशल्य त्यांच्या हाताला, नाही यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. ही बाब लक्षात घेवून दुर्गम भागातील आदिवासी बरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, व त्यांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव, यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 07.06.2022 रोजी भव्य महिला महारोजगार मेळाव्याचे पोलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे आयोजन करण्यात आले.               
सदर महिला रोजगार मेळाव्यात दुर्गम भागातील हॉस्पीटॅलिटी व नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या 157 युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता. यावेळी शिलाई मशिन प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 57 महिला प्रशिक्षणार्थींना मा. खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे, यांचे हस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, राळेगाव येथे हॉस्पीटॅलिटी व नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या 100 महिला प्रशिक्षणार्थींना गुलाबपुष्प व नियुक्ति प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ‘क्लीन 101’ हे फ्लोअर क्लिनर फिनाईल बनवून स्वत:चा व्यवसाय सूरू करून आत्मनिर्भर झालेल्या आत्मसमर्पीत महिला यांचा देखील पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. खासदार श्रीमती सु्प्रिया सुळे यांनी गडचिरोली पोलीस दलाची स्तुती केली असून, जिल्ह्रातील बेरोजगार महिलांना रोजगार तसेच विविध शासनाचे उपक्रम राबवून युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देत असल्याबाबत पोलीस दलाविषयी अभिमान वाटतो तसेच जिल्ह्रातील युवक-युवतींनी रोजगार स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन आपल्या जिल्ह्राचे नाव उंचवावे  असे आपल्या मनोगतात सांगितले.

आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 484, नर्सिंग असिस्टंट 1193, हॉस्पीटॅलीटी 346, ऑटोमोबाईल 254, इलेक्ट्रीशिअन 142, प्लंम्बींग 27, वेल्डींग 33, जनरल डयुटी असिस्टंट 38, फील्ड ऑफीसर 11 तसेच व्हीएलई  45 असे एकुण 2573 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 105 मत्स्यपालन 60 कुक्कुटपालन 444, बदक पालन 100, शेळीपालन 67, शिवणकला 162, मधुमक्षिका पालन 32, फोटोग्राफी 35, भाजीपाला लागवड 540, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 780, टु व्हिलर दुरुस्ती 34, फास्ट फुड 35, पापड लोणचे 30, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 370 असे एकुण 2794 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
 सदर महिला रोजगार मेळाव्यास मा. श्रीमती सुप्रियाताई सुळे, खासदार, मा. पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र श्री संदिप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा, मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. अनुज तारे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सा., संचालक प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, श्री. राजेश थोकले, प्रोग्राम हेड प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन (हेल्थ केअर)  मा. अनिता गांघुर्डे हे उपस्थित होते.
 महिला रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments