Header Ads Widget

Responsive Advertisement

महामहीम राज्यपाल कौशारींच्या बहुमत सिद्ध करण्याच्या आदेशाविरुद्ध शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

राज्यपाल कौशारीं यांच्या निर्णयामुळे संवैधानिक पदावर शंका निर्माण होत आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिलेल्या बहुमत चाचणी आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याची सुनावणी आज संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. राज्यपालांच्या या निर्देशाविरोधात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनील प्रभू यांच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टातने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करावी, असा युक्तिवाद केला.


अभिषेक मनु सिंघवी यांनी बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दोन्ही न्यायाधीशांनी चर्चा केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला कागदपत्रे द्यावीत. “आम्ही आज ४ वाजेपर्यंत पेपरवर्क पूर्ण करू” असे सिंधवी यांनी सांगितले. आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर सुनावणी झाली तर आमचे म्हणणे निरर्थक ठरेल, असेही सिंघवी म्हणाले. बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, असे निरज किशन कौल म्हणाले.


यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आज या खटल्याची सुनावणी करणार आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्रे तयार ठेवा, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणावर संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टातने स्पष्ट केलं आहे.

                         मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                       (EDITOR IN CHIEF) 





 

  

         

Post a Comment

0 Comments