Header Ads Widget

Responsive Advertisement

*आलापल्ली वनपरिक्षेत्र व मिरकल ग्रामस्थांनी साजरा केला जागतिक पर्यावरण दिन* p10news

 

 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

*आलापल्ली वनपरिक्षेत्र व मिरकल ग्रामस्थांनी साजरा केला जागतिक पर्यावरण दिन*
*ग्लोरी ऑफ आलापल्ली येथे स्वच्छता मोहीम व पर्यावरण विषयक मार्गदर्शनाचे आयोजन*


गडचिरोली, दि.०५: जागतीक पर्यावरण दिनानिमित्य आलापल्ली वनपरिक्षेत्रा मध्ये 05 जून जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन आलापल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक श्री डॉ.किशोर मानकर व आलापल्ली वनविभागाचे उपवसंरक्षक राहूलसिंह टोलीया यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आलापल्ली हेमलकसा मार्गावरील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले व जागतीक वारसा स्थळ म्हणुन प्रसिध्द असलेल्या ग्लोरी ऑफ


आलापल्ली येथे वनपरिक्षेत्र कार्यालय, आलापल्ली व मिरकल ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ग्लोरी ऑफ आलापल्ली येथील परिसर व मिरकल तलाव येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर कार्यक्रमांत मिरकल ग्रामचे मोठया प्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

या प्रसंगी प्रमुख अतीथी म्हणुन आलापल्लीचे सहाय्यक वनसंरक्षक नितेश शंकर देवगडे मिरकल गावाचे प्रतिष्ठीत नागरीक तथा गाव प्रमुख करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे व आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर हे होते. या प्रसंगी बोलताना नितेश शंकर देवगडे यांनी कर्मचारी तथा ग्रामस्थांना पर्यावरण चळवळीच्या इतिहासाबद्दल माहिती दिली व पर्यावरण संवर्धनाचे महत्व उपस्थित ग्रामस्थाना पटवून दिले. तसेच पर्यावरण संवर्धना करीता जीवसृष्टी मध्ये प्रत्येक जीव

महत्त्वाचा असून पर्यावरण संरक्षणा करीता प्रत्येक नागरीकांनी काम करणे गरजेचे आहे असे म्हटले. तसेच मिरकल ग्रामचे प्रतिष्ठित नागरीक करपा गीसू कुळमेथे यांनी पहिलांदा वनविभागाच्यावतीने सदर अभियानात गावकऱ्यांना सामावून घेतल्यामुळे ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्व कळले असुन

मिरकल ग्रामस्थ तथा वनविभाग यांचे नाते असेच दृढ़ होत गेल्यास ग्लोरी ऑफ आलापल्ली येथे पर्यटनाचा विकास होवुन स्थानिक ग्रामस्थांना मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा अशावाद व्यक्त केला. वनपरिक्षेत्र कार्यालय, आलापल्ली ते ग्लोरी ऑफ आलापल्ली पर्थत 16 कि.मी. अंतराची मोटर

सायकल रॅली या प्रसंगी काढण्यात आली होती. सदर रॅलीव्दारे तलवाडा व मिरकल गावात वन व

पर्यावरण विषयी जनजागृती करून वृक्ष रोपवनाचे कार्यक्रम घेण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे संचालन क्षेत्र सहाय्यक झिमेला मोहन भोयर व आभार प्रदर्शन विशेष सेवा वनपाल पूनम बुध्दावार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वनपाल ऋषीदेव तावाडे, रेखा किरमिरे, वनरक्षक देवानंद कचलामी, दामोदर चिव्हाणे, सचिन जांभुळे, संतोष चव्हाण, बक्का कुळमेथे, महेद्रं येलीचपूरवार, राठोड, साहिल इझाडे, लक्ष्मी नाने, वंदना कोडापे, शेख, वनमजुर बंडु रामिरगवार, निखील गड्डमवार, मलेश, वाहन चालक सचिन डांगरे तथा वन परिक्षेत्रातील कर्मचारी व मिरकल ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments