Header Ads Widget

Responsive Advertisement

उद्यमिता यात्रेचे जिल्हयात स्वागत*p10news

 


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

*उद्यमिता यात्रेचे  जिल्हयात स्वागत*
*यात्रेच्या पुढील प्रवासाला आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा*


गडचिरोली/दि.27: गडचिरोली - युथ एड फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली राज्यव्यापी उद्यामिता यात्रा 15 जिल्ह्यांचा प्रवास करून आज गडचिरोली येथे पोहचली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त नागपूर विभाग डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी उद्यमिता यात्रेचे जिल्हयात स्वागत केले. अधिकारी महोदयांनी उद्यमिता यात्रा उपक्रमाची माहिती घेत यात्रेच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. सकाळी 11 वाजता गोंडवाना कला केंद्र सभागृहात तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षण उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. 

उद्घाटन प्रसंगी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग गडचिरोली योगेंद्र शेंडे, जिल्हा कौशल्य विकासमार्गदर्शन अधिकारी गडचिरोली श्री. चीमनकर, प्रकल्प अधिकारी एनयूएलएम गडचिरोली श्री. ठाकरे, प्रकल्प अधिकारी स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली, श्री.मेश्राम, एमजीएनएफ फेलो गडचिरोली श्री.गणेश चिंतलवार या प्रमूख पाहुण्यांची उपस्थिती होती. प्रविण जाधव यांनी उद्यमिता यात्रेचे स्वरूप, ध्येय आणि उद्दिष्टे मांडल्या नंतर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.


नवउद्योजकांनी बाजाराच्या गरजा लक्षात घेवून व्यवसाय सुरू केला पाहिजे. लोकांच्या गरजा पूर्ण करणे हे यशस्वी व्यवसायाचे गमक असल्याचे मत योगेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले. श्री चिमनकर यांनी व्यवसाय बंद का होतात याची विविध कारणे सांगत नविन उद्योजकांनी या सर्व बाबींची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले.श्री मेश्राम यांनी नवीन उद्योजकांनी मोठे कर्ज न घेता सुरुवातीला कमी पैश्यात व्यवसाय उभा करावा म्हणजे व्यवसाय करताना अडचणी कमी येतील असा सल्ला दिला.तर शेवटी उद्यमिता यात्रा राज्य समन्वयक मनोज भोसले यांनी व्यवसाय ही एक प्रक्रिया असून त्याचा नवीन उद्योजकांनी आनंद घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले.

  आभार प्रदर्शन झाल्यानंतर उद्घाटन समारंभ संपन्न झाला व तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षणाचीसुरुवात झाली.प्रशिक्षक ज्ञानु कांबळे पुढील तीन दिवस व्यवसाय विकास प्रशिक्षण देणार आहेत.पाहिल्या दिवशी 50 प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते. त्यात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणातहोती. उद्घाटन समारंभ संपन्न करण्यासाठीं गणेश चिंतलवार,( एम जी एन एफ फेलो), उद्यमिता यात्रा जिल्हा समन्वयक श्री. कमलाकर आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

*****

Post a Comment

0 Comments