Header Ads Widget

Responsive Advertisement

ठाणेगाव ग्रमपंचायतीचे तिन सदस्य ग्रा.पं.कर न भरल्याने व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्यामुळे अपात्र.-जिल्हाधिका-यांची कारवाई P10NEWS

     

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

गडचिरोली/ठाणेगाव:- आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायत येथील तिन सदस्यांनी ग्रामपंचायतचे शासकीय कर न भरल्याने व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने मा संजय मिना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केली अपात्रतेची कारवाई केली.त्या तिनही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.यामुळे ठाणेगाव येथे खळबळ निर्माण झाली आहे.सदस्यत्व रद्द झालेल्या मध्ये मनोज दशरथ जुवारे,निता रेवनाथ मडावी, मंगेश सुभाष मडावी,यांचा समावेश आहे.                          प्राप्त माहितीनुसार मनोज दशरथ जुवारे, यांनी आरमोरी येथील दुकानासाठी एक खोली किरायाने घेऊन तिथे मे. विदर्भ वेल्डिंग या नावाने दुकान स्थापित करुन दुकानासाठी जागा अपुरी पडल्याने समोर शेड उभारून रस्त्यावर वेल्डिंगचे काम करतो.अशाप्रकारे अंदाजित ७ फुट राष्ट्रीय महामार्गावर मनोज जुवारे यांनी अनधिकृतरित्या बांधकाम करुन त्यासमोरील जागेवर कब्जा केला आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण असताना सुद्धा ग्रामपंचायत ठाणेगावच्या सदस्यपदी कामकाज करित असल्याची तक्रार गोपाल भांडेकर यांनी केली होती.तर ग्रामपंचायत सदस्य निता रेवणनाथ मडावी व मंगेश शुभाष मडावी या दोन्ही सदस्यांनी शासकीय कराच्या रकमेचा भरणा विहित मुदतीत ग्रामपंचायत कार्यालयात केलेला नसल्याची तक्रार चंद्रशेखर बालाजी नैताम यांनी केली होती.प्रकरणात तक्रार दाखल केलेल्या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद दस्तऐवज,गट विकास अधिकारी यांचा अहवाल तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३ चे कलम १४(१)(हे) मधील कायदेशीर तरतुदींनुसार निकाली काढीत जी व्यक्ती पंचायतीला बिल देण्यात आल्याच्या तारखेपासून तिन महिन्याच्या आत भरण्यास कसुर करील अशी व्यक्ती पंचायतीला सदस्य असणार नाही.यामुळे ठाणेगाव ग्रामपंचायत येथील सदस्य निता रेवनाथ मडावी व मंगेश शुबास मडावी यांनी विहीत मुदतीत कराचा भरणा केला नसल्याने जिल्हाधिकारी अपात्रतेची कारवाई केली आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३) चे कलम १४(१)(ज-३) प्रमाणे ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे.अशा व्यक्ती पंचायतीचा सदस्य असणार नाही.किंवा सदस्य म्हणून चालु राहणार नाही.यामुळे मनोज दशरथ मडावी यांच्यावर सुध्दा अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.यामुळे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF).           

                     


Post a Comment

0 Comments