Header Ads Widget

Responsive Advertisement

बसपा ने गोंडराजे बख्त बुलंदशहा उईके यांची जयंती साजरी केली P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

*👑🐘🌹बसपा ने गोंडराजे बख्त बुलंदशहा उईके यांची जयंती साजरी केली*

👑तीनशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या नागपूर नगरी व राजधानीचे निर्माते गोंडराजे बख्त बुलंदशहा उईके यांची जयंती. बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र विधान भवन चौकातील गोंड राजे बख्त बुलंदशहा उईके यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून साजरी करण्यात आली. 

👑बख्त बुलंदशहा उईके मध्य प्रदेशातील देवगडचे ते आपल्या राजधानीसह नागपूर ला 1668 ला आले व 1706 पर्यंत 38 वर्ष राज्य केले. दरम्यान 1702 ला त्यांनी हल्लीचे नागपूर व परिसरातील 12 गावे एकत्र करून नागपूर नावाने एक शहर वसवून राजधानी बनविली त्याला आज महानगराचे स्वरूप प्राप्त झाले. 

👑2002 ला नागपूरच्या स्थापनेला 300 वर्षे झाली तेव्हा नागपूर जिल्हाधिकारी, त्रिशताब्दी समिती (उमेश चौबे यांच्या नेतृत्वात माझाही समावेश होता)  व मनपाच्या दिशा निर्देशाने विधान भवन चौकात 2008 ला गोंडराजे बख्त बुलंदशहा यांचा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यात आला. 

👑नागपूर स्थापन करतांना राजापूर, रायपूर, हिवरी, फुटाळा, हरिपूर, सीताबर्डी, वानरे, आकरी, लेंड्रा, सक्करधरा, गाडगे, भानखेडा आदि 12 गावाचा समावेश केला. त्यानंतर बीडीपेठ, पारडी, तकिया, वाठोळा, दिघोरी, लिंबाझरी, नारा-नारी, खैरी, भिलगाव, शिवणगाव आदि गावेसुद्धा नंतर समाविष्ट करण्यात आली. अशी माहिती बसपा नेते उत्तम शेवडे ह्यांनी यावेळी दिली.

👑बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांचे अध्यक्षते खाली, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, विजयकुमार डहाट, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडस्वार, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. या अभिवादन समारोहाचे सूत्रसंचालन बसपाचे माजी नगरसेवक विकास नागभिडे यांनी, प्रास्ताविक एडवोकेट विजय वरखडे यांनी तर समारोप विनोद सहाकाटे आदी आदिवासी नेत्यांनी केला. 

👑याप्रसंगी प्रामुख्याने बसपाच्या महिला नेत्या सुनंदाताई नितनवरे, माजी नगरसेवक सागर लोखंडे, अभिलेष वाहने, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, मनोज गजभिये, नितीन वंजारी, मनोज निकाळजे, जगदीश गजभिये, किशोर गोसावी, सदानंद जामगडे, योगेश लांजेवार, श्रीकांत बडगे, राजरत्न कांबळे, जितेंद्र मेश्राम, बुद्धम राऊत, सुमंत गणवीर, भास्कर कांबळे, शिवपाल नितनवरे, अभय डोंगरे, सुमित जांभुळकर, शुभम गजभिये, प्रकाश चव्हाण, सनी मून, जनार्दन मेंढे, अनिल मेश्राम, राजरत्न कांबळे, तपेश पाटील आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                           (EDITOR IN CHIEF)               


Post a Comment

0 Comments