Header Ads Widget

Responsive Advertisement

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश तसेच स्वयंम् योजनेमध्ये लाभाची सुवर्णसंधी p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश 

तसेच स्वयंम् योजनेमध्ये लाभाची सुवर्णसंधी


गडचिरोली/दि.06: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 13 मुलांचे व 8 मुलींचे असे एकूण 21 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यांची एकूण इमारत प्रवेश क्षमता 2115 असून त्यातील सन 2022-23 करीता रिक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचे एक असे एकूण तीन वसतीगृह आहेत. गडचिरोली वसतीगृहात इयत्ता 11 वी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच गडचिरोलीचे तीन वसतीगृह वगळता उर्वरीत अठरा वसतीगृहात इयत्ता 8 वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करावे तसेच सदरील सुचनेनुसार कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतीगृहातील जुने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अर्ज Renew हे Option  निवडून भरावे. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे असे समजुन त्याचे जागी नविन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन कागदपत्रांसह हार्डकॉपी संबंधीत वसतीगृहात एक आठवडयाच्या आत सादर करावी. तसेच जिल्हास्तरावर वसतीगृहाबाहेर राहुन उच्च शिक्षण घेत असलेल्या व तालुका स्तरावर व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम् योजनेकरीता इच्छुक असल्यास त्यांनी सदर प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा व ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून कागदपत्रांसह हार्डकॉपी संबंधीत महाविद्यालयात सादर करावी असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी कळविले आहे .                                   

                     मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक.                                      (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments