Header Ads Widget

Responsive Advertisement

समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे "समाज प्रबोधन कार्यक्रम" संपन्न ! P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

     समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य         तर्फे  "समाज प्रबोधन कार्यक्रम" संपन्न !                                   

      गडचिरोली/चामोर्शी येथे दिनांक 28/01/2024 रोजी रविवारला ठिक 12 वाजता स्थळ: चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे "समाज प्रबोधन कार्यक्रम" संपन्न. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मा. कांशीराम साहेब यांच्या "जाती तोडो समाज जोडो" या स्वाभिमानी चळवळ व स्व आत्मसन्मान जीवन जगण्याचा समाजबांधवांना प्राप्त होने हा मुलभूत अधिकार आहे आणि ही आपली हजारो वर्षांपासून चाललेली लढाई आहे. आपल्या पुर्वजांचा इतिहासातुन धडा घेऊन त्यांच्या विचारांने प्रेरित होऊन समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                   


 यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.प्रभाकर इटकेलवार रॉंऊ. ऑफिसर  यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी श्री. किशोर नगराळे सर मुख्याध्यापक, उपस्थित होते. आणि या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. लक्ष्मण मोहुर्ले, सा. का. गडचिरोली. मा रुपेश वालकोंडे, संघटनेचे अध्यक्ष , स.स.स.प.सं.महाराष्ट्र राज्य, मा. राजेश कलगट्टीवार, मा बबण गोरंतवार सरपंच पोंभुर्णा,मा. दिंगाबर लाटेलवार,मा. प्रभाकर वासेकर, मा. धर्मराव तानादु सर, मा. विजय देवतळे,  मा.मायाताई मोहुर्ले, अध्यक्ष, महिला आघाडी गडचिरोली, मा. अनिता जील्हेप्पल्लीवार सरपंच,मा.किशोर नरुले,मा.शेखर पुल्लीवार, मंदीप गोरडवार सा. का. गडचिरोली, सर्वांनी संघटनेचे उद्देश व कार्य समजावून सांगितले. तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समाजबांधव श्री. परमेश्वर मोहुर्ले, अध्यक्ष चामोर्शी,  परशुराम बोलीवर, उपाध्यक्ष चामोर्शी, राहुल जिलेपल्लीवार,  रमेश मोहुर्ले, सुभाष कोहळे, विकास मोहुर्ले, पुरुषोत्तम मोहुर्ले, भावना बोलीवर, जयश्री रामटेके,कोमेश्वर बोलीवार, प्रकाश मोहुर्ले, दुर्योधन देवगडे, उमाजी कोहळे, नल्लुजी घोगरे, वसुधा वासेकर, वाकडी , गुरुदास जील्हेवार , सौ. कल्पनाताई मोहुर्ले, विद्या वासेकर, प्रिती वासेकर , पुनम इटकेलवार, शंकर वासेकर वाकडी, कोमेश्वर बोलीवार,भोगनबोडी, चंद्रदास इटकेलवार, गोकुळ मोहुर्ले, पुरूषोत्तम मोहुर्ले, बाबुराव पौरकार, सूभाष कोहळे, प्रमोद रामटेके, विकास मोहुर्ले, नामदेव देवताळे, इत्यादी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. बहुजन चळवळीत उत्साहाने सहभागी झाले. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व समाज बहुजन समाजाची निर्मिती करुन शासक बनण्याची वाटचाल करने व परिवर्तन करने काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. धर्मराव नागोराव दुर्गमवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन या. मंदीप गोरडवार सा.का. गडचिरोली यांनी केले. 
    


                        मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          (EDITOR IN CHIEF).                                      


Post a Comment

0 Comments