Header Ads Widget

Responsive Advertisement

अधिवक्ता सतीश जैनवार यांच्या मुलाचा वाढदिवस कार्यक्रमाला कंकडालवार दांपत्याची उपस्थिती. P10NEWS

 

  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF

 अधिवक्ता सतीश जैनवार यांच्या मुलाचा वाढदिवस कार्यक्रमाला कंकडालवार दांपत्याची उपस्थिती.


अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील नामवंत वकील ,न्यायालयीन प्रकरणांत गरीब लोकांना न्याय देण्यासाठी नेहमी तत्पर असणारे ऍड.सतीशभाऊ जैनवार यांचे चिरंजीव साफल्या सतीश जैनवार यांच्या वाढदिवस काल अहेरी येथील इंडियन पॅलेस फॅंक्शन हॉलमध्ये उत्साहात आयोजित करण्यात आले. या वाढदिवस कार्यक्रमाला आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार या दाम्पत्यांनी उपस्थिती दर्शवून साफल्य ला शुभाशीर्वाद देऊन भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.

यावाढदिवस कार्यक्रमाला कंकडालवार दांपत्यासोबत माजी जि.प.सदस्य अजय नैताम, नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,रवी भोयर,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम, विनोद रामटेकेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित राहून साफल्य ला आशीर्वाद दिले.

                     
                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                            (EDITOR IN CHIEF).                            

Post a Comment

0 Comments