Header Ads Widget

Responsive Advertisement

लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलमपाडी येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न. P10NEWS

 

   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलमपाडी येथे  शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

कंपनीचे वतीने शाळेतील विध्यार्थ्यांना स्कूल बॉग वितरण.

गडचिरोली :-5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एटापली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलमपाडी या ठिकाणी देखील 5 सप्टेंबर रोजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे पदधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.अगदी तसाच अनुभव मलमपाडी शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात आला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी  शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली. एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील भूमिका काही विद्यार्थ्यांनी पार पाडल्या.थोडक्यात 5 सप्टेंबर या दिवशी सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांनी चालवली. शिकवणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी व  शिकणाऱ्या इतर  विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. सकाळी साडे दहा ते दुपारी दोन या वेळामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले ,त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगताचा कार्यक्रम पार पडला.  या कार्यक्रमाला लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन अधिकारी उपस्थित होते. कंपनीचे वतीने शिक्षकांना बक्षीस आणि विध्यार्थ्यांना स्कूल बॉग वितरण करण्यात आलं.यांनी देखील शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्यध्यापक विद्यासागर मांदाडे  यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना आता समजले असेल की शिक्षकांना त्रास देणे कसे चुकीचे आहे ! हे वाक्य ऐकून सर्व विद्यार्थी गप्प झाले. सर्व विद्यार्थ्यांनी शब्द दिला की, यापुढे आम्ही शिक्षकांच्या तासाला मस्ती करणार नाही.

                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          (EDITOR IN CHIEF).                                         


Post a Comment

0 Comments