Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा खुर्सा येथे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी पार पडले. P10NEWS

 

  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

     जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा खुर्सा येथे वार्षिक                    स्नेहसंमेलन यशस्वी पार पडले.

गडचिरोली/दिनांक ३१जानेवारी ते २फेब्रुवारी या दरम्यान  वार्षिक व कला, क्रीडास्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा खुर्सा  केंद्र आंबेशिवानी  पंचायत समिती गडचिरोली.खुर्सा येथे घेण्यात आले. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आले.सदर स्पर्धा मध्ये खेळाडूनी कौशल्याचे प्रदर्शन केले.


 विध्यार्थ्यांना बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या सांस्कृतीक कौशल्यचा विकास व्हावा, त्यांना कलेतून आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व  विकास दाखविता यावा या करिता वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडास्पर्धेचे करण्यात आले. कार्यक्रम चे उदघाटन सरपंच मंजुळा पदा व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राजेश मंगर, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज उरकुडे यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. पहिल्या दिवशी विध्यार्थ्यांचे कबड्डी, खो खो, व्हॅलीबाल, रनिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आले तर १फेब्रुवारी ला प्रश्नामंजुषा, वक्तृत्वस्पर्धा व रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या मध्ये विध्यार्थांनी समूहनृत्य, लावणी, देशभक्ती गीत, विनोदी नाटिका सादर करून कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे मुरकुटे सर, चापले सर, उपसरपंच  विनोद रामटेके ,माजी सरपंच संतोष तुलावी,पोलीस पाटील प्रशांत रामटेके, आकाश लाडवे, संतोष आंबोरकर सर्व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्यगण, पालक उपस्थित होते.

कार्यक्रम प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश वासलवार सर यांनी केले तर,संचालन श्री जगदीश मडावी सर यांनी केले.

वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीते करिता श्री अविनाश येणप्रेड्डीवार सर, श्री किशोर उईके सर, श्री जगन्नाथ हलमी सर, रोहित मेश्राम, आशिष आंबोरकर यांनी मोलाची भूमिका पार  पाडले.

                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                            EDITOR IN CHIEF.   

                             
Post a Comment

0 Comments