Header Ads Widget

Responsive Advertisement

विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित 306 प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यास पोलिस स्टेशन गडचिरोली येथील तपास यंत्रणेला यश. P10NEWS

     

  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

     विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित 306 प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यास पोलिस स्टेशन गडचिरोली येथील तपास यंत्रणेला यश.                                                        

         गडचिरोली/25:-  विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित -306 गडचिरोली येथे मंगेश महादेव नरड 46 वर्षे रा. खरवड ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर ह.मु. गोकुल नगर गडचिरोली हा अभिकर्ता तसेच व्यवस्थापक म्हणून कार्यरत असतांनाचे दरम्यान दिनांक, 13/08/2016 ते दिनांक, 22/01/2023 दरम्यानचे काळातील पतसंस्थेच्या अध्यक्षा तथा संचालिका श्रीमती विजया शरदराव गदेवार रा. गडचिरोली यांनी त्यांच्या कडे पतसंस्थेतील आर्थिक व्यवहार व त्यासंबधातील सर्वप्रकारची जबाबदारी विश्वासाने सोपवली असता त्यांच्या ताब्यात असलेल्या  मुदतबंद ठेवी स्वरुपातील मुल्यवान रोखे, दैनिक पिग्मिबचत योजनाचे पासबुक गैरमार्गाने वापरून सदरचे मौल्यवान रोखे हे बनावट असल्याचे सक्षम कारण माहित असताना सुद्धा कपटीपणाने व अप्रामाणिकपणे त्यावर अधिकृत अध्यक्षा तथा संचालिका श्रीमती विजया शरदराव गदेवार यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून व त्यात फेरबदल करून गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन नमुद पतसंस्थेमध्ये इतर राष्ट्रियकृत बैंका पेक्षा मोठ्या प्रमाणात व्याजाचा दर असल्याने सांगुन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करुन त्यांना दिलेले रोखे हे खरे असल्याचे भासवून त्यांचा विश्वासघात करुन त्यांच्याकडुन मुदतबंद ठेवी , आर डी तसेच दैनंदिन पिग्मि बचत योजनेच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात स्विकारलेल्या रक्कमा आपले स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्याचे उद्देशाने फिर्यादी तसेच इतर गुंतवणूकदारांना सोबत ठकबाजी करुन त्यांची एकूण 67,31,650/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली. अशा मजकुराचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलिस स्टेशन गडचिरोली येथे दिनांक 20/02/2023 रोजी अप. क्र. 132/2023 कलम 406,409,420,467,468,471, भादवि प्रमाने गुन्हा नोंद असुन सदर गुन्ह्याचा तपास आम्ही पोलिस निरीक्षक अरविंदकुमार डी. कतलाम पोलिस स्टेशन गडचिरोली करीत आहोत.


पतसंस्तेमध्ये गुंतवणूक केलेल्या मुदतबंद ठेविचा कालावधी पूर्ण झाल्याने संबंधित गुंतवणुकदार हे संबंधित एजंट कडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली असता यातील आरोपी हा दिंनाक हा दिनांक  30/01/2023 पासुन यातील त्याचा स्वतः चा तसेच आपले पत्नीचा सुद्धा मोबाईल बंद करून गडचिरोली येथील फरार झाला.नमुद प्रकरणात त्याचे विरुद्धात गुन्हा नोंद झाल्याचे चाहूल लागल्याने तो त्याची अटक चुकविण्याकरिता स्वतः चे अस्तित्व लपवून  पोलिसांची दिशाभूल करुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करित होता. तरि नमुद गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अरविंदकुमार डी कतलाम यांनी अहोरात्र परिश्रम करून फरार आरोपीचे वास्तव्याची खात्रीशीर माहिती संकलित करुन दिनांक 24/02/2023 रोजी मौजा सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथुन ताब्यात घेऊन त्यास अटक केली असून नमुद आरोपीस आज दिनांक 25/02/2023 रोजी मा. न्यायालया समक्ष हजर करुन नमुद आरोपींचा दिनांक 25/ 02/2023  ते दिनांक 04/03/2023 प्रर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजुर करवुन घेतला आहे. नमुद गुन्ह्यात सक्रिय असलेल्या इतर आरोपिंताची भुमिका व सहभाग स्पष्ट होताचं त्याना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.तरी ज्या गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे.त्यानी तपासी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                        EDITOR IN CHIEF.                                              


Post a Comment

0 Comments