Header Ads Widget

Responsive Advertisement

आलापल्ली वनपरिक्षेत्रात कक्ष क्रं-81मधील रात्रो 1.00 वाजता गस्तीवर असलेल्या पथकाला विर बाबुराव चौकात खवले मांजर मिळताचं त्याचे बचाव करुन आलापल्ली वनविभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची तयारी सुरू केली.. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

आलापल्ली वनपरिक्षेत्रात कक्ष क्रं-81मधील रात्रो 1.00 वाजता गस्तीवर असलेल्या पथकाला विर बाबुराव चौकात खवले मांजर मिळताचं त्याचे बचाव करुन आलापल्ली वनविभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची तयारी सुरू केली.. 

गडचिरोली/दिं-23:-  आलापल्ली वनपरिक्षेत्रा मधील कक्ष क्रमांक 81 मध्ये काल रात्री 1.00 वाजता आलापल्ली वनपरिक्षेत्रातील गस्तीवर असलेल्या पथकाला  Indian Pangolin खवले मांजर प्रजातीच्या वन्यजीव आलापल्ली येथील विरबाबुराव चौक आलापल्ली येथे आढळून आले. गस्तीवरील पथकाने खवले मांजर चे बचाव केले. खवले मांजर ची पशुसंवर्धन अधिकारी अहेरी डॉक्टर उमरदंड यांच्या कडून तपासणी करण्यात आली असुन ते स्वस्थ आहे. खवले मांजर याला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची तयारी वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली कडुन सुरु आहे. 


     गेल्या सात दिवसा आधी वन्यजीवाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती आलापल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांना मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारावर त्यांनी सदर परीसरात दिवसरात्र गस्त वाढवून वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्या सोबतच खबऱ्यांचे जाळे वाढवीले होते.  अश्या परिस्थितीत मध्ये आलापल्ली मधील मुख्य रहदारी व बाजारपेठेने गजबजलेल्या ठिकाणी खवले मांजर आढळणे ही शकां निर्माण करणारी बाब असल्याने सदर भागातील सर्व सिसीटीव्ही तपासुन तपासाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सदर  प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ किशोर मानकर, आलापल्ली चे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया, गडचिरोली चे विभागीय वनाधिकारी जमीर शेख व उपविभागीय वनाधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली योगेश शेरेकर करीत आहे. सदर कार्यवाही मध्ये क्षेत्र सहाय्यक प्रकाश राजुरकर, ऋषी तावाडे, वनरक्षक देवानंद कचलामी, अनिल पवार, तुषार मडावी,सचिन जाभुळे, महेंद्र इलीचपुरवार, कौलाश मातने, गणेश मलगाम, लक्ष्मी नाने, जम्मो पुढो, रूपेश तरेवार,वनमजुर बंडू आत्राम, बंडू रामगीरवार, स्वप्नील गजीवार, नरेंद्र कोटरंगे, यांचा सहभाग.  

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                            EDITOR IN CHIEF

                       
Post a Comment

0 Comments