Header Ads Widget

Responsive Advertisement

देसाईगंज वडसा ए.ए.एनर्जी थर्मल पावर प्लांट येथील विस्फोटात एका इंजिनिअरचा मृत्यू व एक गंभीर जखमी. P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


 देसाईगंज वडसा येथील ए ए एनर्जी थर्मल पावर प्लांट मध्ये आज पहाटे झालेल्या विस्फोटात एका इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे. संजय सिंग (30) असे मृत्यू झालेल्या इंजिनियरचे नाव आहे तर गौरव केळझरकर (35) मजूर जुनी वडसा येथील रहिवासी आहे.


स्थानिक ए ए एनर्जी थर्मल पावर प्लांट मध्ये प्रोडक्शन लाईन वर पाहणी करण्याकरीता इंजिनियर सिंग आणि गौरव केळझरकर मजूर गेले होते. याच दरम्यान पहाटे साडेचार वाजता पाहणी करत असतांना अचानक स्टीम लाईनचा विस्फोट झाला. यात हे दोघे ही गंभीर जखमी झाले. इंजिनियर संजय सिंगला लगेच देसाईगंज येथील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी आणले गेले असता पायाच्या हाडाला दुखापत असल्याने तेथे कुठलेही ऑर्थोपेडीक उपलब्ध नसल्याने खाजगी दवाखान्यात त्यांना नेण्यात आले. मात्र यावेळी खाजगी डॉक्टर उपलब्ध नही झाल्याने 17 किमी दूर असलेल्या ब्रम्हपूरी येथील सावजी रूग्णालयात नेण्यात आले व तेथे उपचार सुरू असतांना संजय सिंग यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच गंभीर जखमी गौरव केळझरकरला ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.


                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                       EDITOR IN CHIEF

                


Post a Comment

0 Comments