Header Ads Widget

Responsive Advertisement

अपहरणाचा कट रचणाऱ्या युवकांनाचं नौकरी देणाऱ्या सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांचा समाजासमोर नवा आदर्श ! P10NEWS

     

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

      "बंदुका सोडा तुम्हाला नौकरी देण्यात येईल." अपहरण करणाऱ्यांच्या हाताला काम" - राधेश्याम चांडक


बुलढाणा/दिनांक,२२:- बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष  श्री. राधेश्याम चांडक व मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती    यांचा अपहरण करण्याचा कट रचणाऱ्या दिल्ली आयबीकडुन तिन युवकांना अटक केली.यामध्ये मिर्झा आलेत बेग वय (२१), शेख साकिब शेख अन्वर वय (२०),उबेद खान शेर खान वय (२०) हे बुलढाणा शहरातील शेर -ए-चौकातील राहणारे आहेत.

      आणी अपहरण करण्याचा कट उधळवुन लावला. परंतु यानंतर सुद्धा राधेश्याम चांडक यांनी नवा आदर्श समाजासमोर ठेवुन त्या युवकांना तुम्ही "बंदुकी सोडा व कामाला लागा." तुमच्या हाताला काम देऊ, त्यांना आपल्या बॅंकेत नौकरी देण्यात येईल किवा व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले. यानंतर एका अपहरण करण्याचा कट रचणाऱ्या युवकांने आपल्या वडीलांना घेऊन  चांडक यांच्याकडे आला. राधेश्याम चांडक यांच्या निर्णयावर सर्व स्तरावरुन त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

                         मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                           (EDITOR IN CHIEF)

                        


Post a Comment

0 Comments