Header Ads Widget

Responsive Advertisement

छतिसगड राज्यातुन खाजगी ट्रॅव्हल मध्ये सुगंधित तंबाखू व गुटख्याची गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी करणाऱ्या आरोपींना सावली पोलीसांनी केली अटक. P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF) ,छतिसगड राज्यातुन खाजगी ट्रॅव्हल मध्ये सुगंधित तंबाखू व गुटख्याची गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी करणाऱ्या आरोपींना सावली पोलीसांनी केली अटक.

चंद्रपूर (सावली)/दिनांक,18:-  छतिसगड राज्यातील खाजगी ट्रॅव्हल गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहेत त्यापैकी एका छतिसगड मधुन येणाऱ्या महिंद्रा खाजगी ट्रॅव्हल मध्ये सूगंधित तंबाखू,गुटखा तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती सावली पोलिस विभागाला मिळताच सावली पोलिस विभागाने पथका द्वारे खाजगी ट्रॅव्हल ची झडती घेतली असता. पोलिस पथकाला सुगंधित तंबाखू व राजर्षी पान मसाला गुटखा कैंबिन मध्ये आढळून आला.


       सुगंधित तंबाखू व गुटख्याची किंमत अंदाजे 30266/- रुपये असुन 15 लाखांची ट्रॅव्हल्स सुद्धा पोलिसांनी जप्त केली.याप्रकरणात चालक तारकेश्वर शाहु,वाहक विरकुमार सोनानी,उमेशकुमार शाहु सर्व आरोपी छतिसगड राज्यातील रहिवासी असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली दादाजी बोलीवार, दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईने सुगंधित तंबाखू व गुटखा माफिया मध्ये खडबड उडाली आहे.

                              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                               (EDITOR lN CHIEF)

                        Post a Comment

0 Comments