Header Ads Widget

Responsive Advertisement

पैठण तालुक्यात सामाजिक वनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार (चौकशीची मागणी: वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन) P10NEWS

मंदीप एम. गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

 

         पैठण/दिनांक,21:-पैठण तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला.असुन रेंजर विशाल कवडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी राजेंद्र दहीफळे यांनी विभागिय आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय वन अधिकारी सामाजिकरण वनीकरण औरंगाबाद वन संरक्षक कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सामाजिक वनीकरण पैठण यांच्यामार्फत झाडे जगवा झाडे लावा.महाराष्ट्र शासनाने योजना राबविली गेली असताना पैठण तालुक्यातील सामाजिक वनीकरण तर्फे रहाटगाव ते आपेगाव दहा किमी सामाजिक वनीकरण तर्फे झाडे लावण्यात आली आहेत.१ जुन २०१९ सुरुवात ते साईट संपणारी तारीख १ जुन २०२२ आहे.त्या कामाकरीता महाराष्ट्र शासनाने तेथे पाच कामगारांना कामगारांना कामावर घेण्याचे आदेश असताना. तेथे तीन कामगारांनाच घेण्यात आले.व दोन कामगारांच्या नावावर बोगस बारा महिने पैसे काढून घेण्यात आले. तसेच एक वर्षभर तीन लोकांना कामावर घेतले व तेही वर्षभर कामावर घेतले व नंतर काढून टाकले.वास्तविक पाहता शासनाने पाच कामगारांना तीन वर्षांकरिता कामावर घेण्याचे आदेश असताना रेंजर यांनी एकाही कामगारांना कामावर घेतले नाही.सध्या कोरोना चे संकट आले आहे.असे कारण पुढे करून राजेंद्र बाबासाहेब दहिफळे,दुर्गेश कराल,किरण भुकेले या तिघांना कामावर येऊ नका, बजेट आल्यावर तुम्हाला कामावर बोलवतो अस त्यांनी सांगितले.वास्तविक शासनाने एकाही कामगारांना काढुन टाकण्याचे आदेश दिले असताना रेंजर यांनी मनमानी करुन दहा किमी बजेट नुसार दोन कामगारांना कामावर घेण्याचे आदेश असताना रेंजर कवडे यांनी एकालाही कामावर घेतले नाही. एका कामगाराला गोड गोड बोलून मी तुला कामावर बोलावतो.तु कामावर येऊन जा मी तुझा पगार काढतो असे सांगितले.सदरील कामगारांने दोन वर्षे काम केले.मात्र त्याचा  पगार काढला नाही.त्या दरम्यान रेंजर कवडे यांची बदली झाली.तरी सुद्धा त्यांनी दोन वर्षाचा एक रुपयाचाही पगार काढला नाही. यावेळी रेंजर यांनी सांगितले की दहा किमी चा पगार बारा महिन्यांनी काढले जाते.यावर कामगारांने विश्वास ठेवला.कारण या पुर्वी या कामगारांचा सहा महिने उशिराने पगार काढण्यात आला होता. त्यामुळे सदरील कामगाराला कवडे हे १२ महिन्यांचा पगार टाकतील अशी आशा होती.

    परंतु त्यांनी राजेंद्र दहिफळे यांचा पगार काढला नाही.माझा दोन वर्षाचा पगार देण्यात यावा.तसेच रेंजर विशाल कवडे यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी.अन्यथा सर्व कामगारांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.असा इशारा राजेंद्र दहिफळे यांनी विभागीय आयुक्त सामाजिक वनीकरण विभाग औरंगाबाद जिल्हाधिकारी औरंगाबाद, विभागीय वन अधिकारी  सामाजिक वनीकरण यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

                                    

                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                         (EDITOR IN CHIEF)

                    


Post a Comment

0 Comments