Header Ads Widget

Responsive Advertisement

शिंदे गट व भाजप सरकार मध्ये एकाही महीलेला मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची नव्या सरकावर सडकुन टीका P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


 महाराष्ट्र/09/:-. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात थरार नाट्यमय रित्या शिंदे गट व भाजप सरकार स्थापन झाली.अनेक दिवसांनंतर विरोधकांचा सततच्या मंत्रीमंडळ स्थापनेबाबत टीकास्त्रानंतर आज मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली.भाजप पक्ष व शिंदे गटाने मंत्रीमंडळात अनेक नेत्यांना शपथविधी देऊन मंत्रीमंडळाची स्थापना केली.

                परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या अनेक महीला नेत्या व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर महीला      समाजसेविकांनी  महाराष्ट्रातील एकाही महीलांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने महीला शक्तीचा अपमान केला व राजकारणातील महीला आरक्षणाची गळचेपी करण्यात आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी केली.तसेच महाराष्ट्रातील समाजसेविका तृप्ती देसाई, यशोमती ठाकुर, अनेक महीला शक्तीने नव्याने स्थापन झालेल्या सरकारवर टीका केली.

                  एकाही मराठी मुंबईतील  माणसाला मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.1995 नंतर पहिल्यांदाच ही घटना घडल्याची टीका -  शिवसेना विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात आली.

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                    (EDITOR IN CHIEF)

                    


Post a Comment

0 Comments