Header Ads Widget

Responsive Advertisement

आरमोरीतील युवकांकडून तयार केलेल्या "हर घर तिरंगा" लघूपट जिल्हाधिकारी मीणा यांचे उपस्थितीत प्रदर्शित P10NEWS


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


*आरमोरीतील युवकांकडून तयार केलेल्या "हर घर तिरंगा" लघूपट जिल्हाधिकारी मीणा यांचे उपस्थितीत प्रदर्शित*गडचिरोली/ दि.24 :- गडचिरोली जिल्हयातील आरमोरी येथील युवकांनी हर घर तिरंगा बाबत जनजागृतीपर “हर घर तिरंगा” या लघुपटाची निर्मिती केली आहे. हा लघुपट जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अतिरीक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, लघुपटाचे लेखक निर्माते दिग्दर्शक गणेश रामचंद्र बैरवार, छायाचित्रकार बालू मने उपस्थित होते. या लघुपटा व्यतिरीक्त यापुर्वी बैरवार यांनी कोविड बाबत विविध जनजागृतीपर लघूपटांची निर्मिती केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्यांचे आभार मानले.

      सदर लघूपट जिल्हा प्रशासनाच्या सोशल मिडीयाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. लघूपटातून हर घर तिरंगा उभारण्याबाबत लहान मुलांकडून संदेश देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा लावण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याला चांगल्या प्रकारे अशा लघूपटातून मदत होईल असे मत जिलहा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी व्यक्त केले.

                            

                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)

                       

                         Post a Comment

0 Comments