Header Ads Widget

Responsive Advertisement

बहुजन समाज पार्टी गडचिरोली तर्फे विद्यार्थी व प्रवाशांच्या सोयीसाठी विभागीय व्यवस्थापक गडचिरोली बसस्थानक यांच्याकडे ब्रम्हपुरी-आरमोरी-वैरागड-रांगी-धानोरा बस सेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


विद्यार्थी व प्रवाशांच्या हिताकरिता ब्रम्हपुरी -आरमोरी-वैरागड-रांगी-धानोरा बस सेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी -बहुजन समाज पार्टी,गडचिरोली


गडचिरोली/दिं,07:- गडचिरोली जिल्हा एस.टी बसस्थानकचे विभागीय व्यवस्थापक श्री मंगेश पांडे व श्री डोंगरे साहेबांना प्रत्यक्ष भेट देऊन गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील व आरमोरी ,रांगी,वैरागड, ब्रम्हपुरी जाणा-या विद्यार्थी व नागरिकांना बसची सुविधा नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच जंगलातील मार्ग असल्यामुळे वाघाच्या दहशतीचे वातावरण आहे.     


            तसेच यापूर्वी ब्रम्हपुरी-आरमोरी-वैरागड-रांगी-धानोरा बस सुरू होती.परंतु कोरोनाच्या काळात ती बस बंद करण्यात आली होती. 

          परंतु आता सर्व शाळा, कॉलेज पुर्ववत सुरू झालेले आहे.यामुळे विद्यार्थ्यांना ही बस शाळेत जाण्या-येण्यासाठी सोयीची होती.ती बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.तसेच रुग्ण, व्यापारी यांच्या सोयीकरिता ती सुरू करण्यात यावी.अशी मागणी बहुजन समाज पार्टी गडचिरोली जिल्हयाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते कडुन विभागीय व्यवस्थापक श्री मंगेश पांडे व श्री डोंगरे साहेबांना निवेदन देऊन मागणी केली.यावेळी बसपा प्रदेश सचिव श्री.डी.एन.रामटेके सर ,मा.शंकर बोरकुट जिल्हा अध्यक्ष बसपा गडचिरोली,मा.प्रदीप खोब्रागडे जिल्हा सचिव, अनिल साखरे, कोषाध्यक्ष,मा.मंदीप गोरडवार वि.स.अध्यक्ष गडचिरोली,कृपानंद सोनटक्के वि.स.अध्यक्ष आरमोरी,मा.जयभद्र बोदेले वि.स.कोषाध्यक्ष आरमोरी,मनोज खोब्रागडे, हेमंत कुलसंगे उपाध्यक्ष वि.स.अहेरी नेतृत्वात निवेदन देऊन चर्चा केली.

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments