Header Ads Widget

Responsive Advertisement

*!!शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा!! - आमदार डॉ, देवराव होळी यांचे आवाहन.* p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

*!!शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा!! - आमदार डॉ, देवराव होळी यांचे आवाहन.* 

मुंबई ,दिनांक 4 जुलै 2022 :- आमदार डॉ. देवराव होळी आणि पुर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीनुसार केवळ २ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या भाजपा युतीच्या शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांप्रति सकारात्मक भूमिका घेवून केंद्र सरकारकडे धान खरेदी उद्धीष्टात वाढ करुन योजनेला दि.३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सदर मागणी प्रमाणे केंद्र सरकारने दि. २/०७/२०२२ च्या पत्रकान्वये राज्य शासनाला पणन हंगाम २०२१-२२ अतंर्गत चालु रबी हंगामातील धान खरेदी उद्धीष्टात तब्बल ४३ लक्ष क्विंटल एवढी घसघशीत वाढ करुन धान खरेदीसाठी दि.३१ जूलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु काल रविवार साप्ताहिक सुट्टी असतांनाही  राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून काल दि. ३ जुलै २०२२ रोजी परिपत्रक निर्गमित केले असून आदिवासी विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही अभिकर्ता संस्थांना तालुकानिहाय धान खरेदीचे उद्दिष्ट ठरवून सद्यस्थितीत सुरू असलेल्या खरीप हंगामातील शेतीची मशागत व पेरणी करीता शेतकऱ्यांची लगबग लक्षात घेता जरी केंद्र सरकारने ३१ जूलै पर्यंत मुदतवाढ दिलेली असली तरी दि.१५ जूलै पर्यंत आँनलाईन नोंदनी झालेल्या सर्व शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

   त्यामुळे धान खरेदी उद्धीष्टात वाढ व धान विक्रीस मुदतवाढ मिळाल्याने आँनलाईन नोंदनी केलेले परंतु अद्यापही धान विक्री पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मविआ सरकारच्या काळात धान उत्पादक परिसरातील सर्व पक्षीय आमदार शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत होते परंतू धान खरेदी संदर्भात बळीराजावर उपकार केल्यासारखे मविआ शासनाद्वारे  निर्णय घेण्यात येत असल्याने सातत्याने धान खरेदी प्रक्रीयेचा खेळ-खंडोबा होवून शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. परंतु महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी युतीचे शेतकऱ्यांप्रति संवेदनशील व लोकाभिमुख सरकार स्थापन होताच केवळ २ दिवसात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम शासनाने केल्याबद्दल आमदार डॉ देवराव होळी यांनी भाजपा प्रणित केंद्र व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले असून आँनलाईन नोंदनी करुनही शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळालेल्या मुदतवाढीचा अधिक विलंब न लावता तातडीने लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केले आहे.

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)Post a Comment

0 Comments