Header Ads Widget

Responsive Advertisement

महापालिकेतील असंघटित कामगाराचे होणारे शोषण थांबवा व विमा संरक्षण द्या: भ्रष्टाचार जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पंढरपूर संघटनेचा इशारा p10news

 

, मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


महापालिकेतील असंघटित कामगाराचे  होणारे शोषण थांबवा व विमा संरक्षण द्या: भ्रष्टाचार जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पंढरपूर संघटनेचा इशारा

प्रतिनिधी नानासाहेब नन्नवरे

 कुरुल प्रतिनिधी: भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेकडून तहसिलदार व प्रांतसाहेब यांना महापालिकेतील असंघटित कामगारांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी, व या कामगारांना विमा संरक्षण मिळावे आणि  असंघटित कामगारांचा पगार जॅब कार्ड द्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा अशा विविध मागण्या संर्दभात महापालिका,तहसील कार्यालयास  भ्रष्टाचार जन आक्रोश संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास अमर उपोषण करू असा इशारा पंढरपूर भ्रष्टाचारी जन आक्रोश संघटनेने निवेदनाद्वारे दिला इशारा.या वेळी महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख संतोष कांबळे व पंढरपूर शाखा सेक्रेटरी श्री के. बी थिटे महिला आघाडी साहेब, सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.हेमा कदम मॅडम पंढरपूर तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा सौ सोनाली गायकवाड आणि संघटनेचे आदीसह  पदाधिकारी उपस्थित होते.

                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments