Header Ads Widget

Responsive Advertisement

आंबेशिवणी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

आंबेशिवणी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद:-

          गडचिरोली/दिनांक,28:-  पंचायत समिती गडचिरोली समुह साधन केंद्र आंबेशिवनी अंतर्गत केंद्राची पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद उ.प्रा.शाळा खुर्सा येथे दिनांक 28/07/2022 रोजी गुरुवारला संपन्न झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राजेश मंगल शाळा व्यवस्थापन अध्यक्ष खुर्सा हे होते.उद्घाटक म्हणून श्रीमती मंजुळा पदा ग्रामपंचायत खुर्सा सरपंचा, कार्यक्रमाचे संयोजक श्री.प्रभाकर बारसिंगे केंद्रप्रमुख तर निरोप अतिथी म्हणून श्री.सुरेश बांबोळकर केंद्र मुख्याध्यापक, श्री.शरद लंजे,विषय साधन व्यक्ती, श्रीमती कल्पना लाढे सुलभक फुलोरा, श्री.सुरेश वासलवार,मु.अ.खुर्सा कु.भारती शिवणकर मु.अ.दिभना, श्री.विनायक इंगळे,मु.अ.,गिलगाव,कु.सुषमा बावणे मु.अ.आंबेटोला, श्री.निवास कोडाप मु.अ.सावरगाव, श्री.आशिष बांबोळे मु.अ.जेप्रा, श्री.नुर पठाण,कु.जयश्री कापकर,कु.सुनिता मळावी,कु.विजया कुमरे कु.साधना मट्टे,श्री.कमरचंद भोयर,कु.शालु नन्नावरे, उपस्थित होते.


(नागपूर येथे मानेवाडा रोड ला 2 bhk flat only 55 lakh rupees, farnichar free .co.mo.no.:-8459508894)

    कार्यक्रमाची सुरुवात दैनिक परिपाठाने इयत्ता सातवीच्या  विद्यार्थ्यांनी केली.सावित्रीबाई फुले आणि सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून मा.मंजुळा पदा सरपंचा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक प्रशिक्षणाची माहिती श्री.सुरेश वासलवार यांनी दिली.श्री.सुरेश बांबोळकर केंद्र मुख्याध्यापक यांनी निपुण भारत शिक्षकांना प्रशिक्षणात कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे.याविषयी मार्गदर्शन केले.श्री.प्रभाकर बारसिंगे केंद्र प्रमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना फुलोरा,सेतु,रिंग टु मी , निपुण भारत, शिष्यवृत्ती विधांजना,आझादी का अमृतमहोत्सव, अनेक शिष्यवृत्या याविषयी योग्य मार्गदर्शन केले.अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री.राजेश मंगर यांनी सर्व शिक्षकांना प्रशिक्षणातून चांगले शिक्षण घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

     श्री. संजय येलेवार,शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थी मिरीरा यांनी डिजिटल क्लास या विषयी पेंट,पेंटचा वापर व स्क्रीन शॉट या विषयी सादरीकरण केले.श्री.सागर आत्राम यांनी रिड टु मी डाउनलोड याचा वापर कसा करायचा या विषयी प्रात्यक्षिक कृती करुन दाखविले.श्री.अमोल जोशी यांनी निपुण भारत जीआर वाचन करून त्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.श्रीमती कल्पना लाढे यांनी फुलोरा विषयी येणाऱ्या अडचणी शिक्षकांना प्रश्न विचारुन मार्गदर्शन केले.श्री.शरद लंजे सर यांनी दिव्यांग विद्यार्थांच्या मिळणा-या योजना व दिव्यांगाचे प्रकार याविषयी मार्गदर्शन केले.कु.नालंदा इंदुरकर मॅडम यांनी शेतु अभ्यासक्रम 45 दिवसात कसा पुर्ण करायचा?त्याचा उद्देश काय याविषयी सांगितले.श्रीमती विजया कुमरे, श्रीमती सुषमा धारणे, यांनी फुलोरा विषयावर वर्ग १ला गणित, भाषा प्रात्यक्षिक कृतीद्वारा वर्ग अध्यापन केले.श्री.सुरेश बांबोळकर सर यांनी घड्याळाचे चित्र काढून वजाबाकी,बेरिज, कृती कसी करायची हे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले.

        प्रशिक्षणासाठी श्री.युगेंद्र मेश्राम, किशोर उईके, अविनाश येनप्रेडीवार , जगन्नाथ हलामी जगदीश मडावी,समिर भजे, प्रल्हाद जेंगटे,नागसाफ तुलावी, शामराव रामटेके, श्री.जुआरे, श्री.कोटरंगे, श्री.मुकुदवार, यांनी सहकार्य केले.प्रशिक्षणास एकोणविस शाळेतील संपुर्ण शिक्षक हजर होते.प्रशिक्षणाचा शेवट वंदे मातरम् ने करण्यात आले.

    संचालन श्रीमती संगीता लाकडे मॅडम यांनी तर आभार श्री.जगदीश मडावी यांनी केले.

                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)Post a Comment

0 Comments