Header Ads Widget

Responsive Advertisement

*प्रशासनातर्फे वैनगंगा नदीकाठील गावांना सर्तकतेचा इशारा* *वडसा ते चिचडोहपर्यंतच्या नदीकाठालगत विशेष काळजी घेण्याची गरज –जिल्हाधिकारी, संजय मीणा* p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


*प्रशासनातर्फे वैनगंगा नदीकाठील गावांना सर्तकतेचा इशारा*

*वडसा ते चिचडोहपर्यंतच्या नदीकाठालगत विशेष काळजी घेण्याची गरज –जिल्हाधिकारी, संजय मीणा*

गडचिरोली,/दि.13 : गेल्या तीन चार दिवसात विदर्भात सतत मुसळाधार पाऊस पडत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यात रेड अर्लट घोषित करण्यात आलेला आहे. सततच्या मुसळाधार पावसामुळे नदींच्या खोऱ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. वर्धा तसेच  चंद्रपूर जिल्हृयातील पाणीही आपल्याकडे वर्धा नदीमार्फत चपराळा येथून वैनगंगेला मिळत आहे. आणि आता गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने आज रात्रीपासून धरणातून जास्त पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुढिल सात तासानंतर वडसा, आरमोरी व गडचिरोली येथील वैनगंगा नदी पात्रात व जवळील नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी धोका पत्करुन नदी नाले ओलांडू नये. त्यामुळे  जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी नागरिकांना घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गडचिरोली जिल्हयात बहूतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी घरातच कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. आता येत्या शनिवार पर्यंत प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवल्या आहेत. नागरिकांनी फिरण्यासाठी अथवा अति महत्त्वाचे काम नसताना बाहेर पडल्यास आपल्यासह आपल्या कुटुंबाला धोका निर्माण होवू शकतो. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. त्यामूळे नैसर्गिक आपत्तीला टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

वैनगंगा नदीकाठावरील वडसा, आरमोरी व गडचिरोलीतील गावांना सर्तकतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात येत असून नागरिकांनी नदी नाले ओलांडण्याचे टाळावे.  पाणी पुलावरुन वाहत असतांना नागरिकांनी पुल पार करु नये असे प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
                   
              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                           (EDITOR IN CHIEF)

Post a Comment

0 Comments