Header Ads Widget

Responsive Advertisement

मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी पदाची शपथ घेतली.(शनिवारी होणार बहुमत चाचणी) P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली.

एकीकडे देवेंद्र फडणवीस स्वतः च्या पक्षाच्या हितासाठी मुख्यमंत्री पद सोडले आणि भाजप पक्ष देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करीत आहेत.

दुसरीकडे शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री पद मिळवलं हे फक्त राजकारणातचं होवू शकतो.


                  एकीकडे पक्षासोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री पद मिळवतात.तर एकीकडे सत्ता महाराष्ट्रात स्थापन व्हावी म्हणून अडीच वर्षांपासून मा.देवेन्द्र फळणविस यांनी अथक परिश्रम घेतले व मी पुन्हा येणार या शब्दाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्न केले.परंतु पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना बनविल्यानंतर त्यांचं स्वप्न भंगले.तर ते काय पक्ष सोडणार काय? असं कधीच होणार नाही.पण भाजप पक्ष सोडून इतर पक्षात असं होताना जास्त दिसतो.यामुळे भाजप नेत्यांकडून खुप काही शिकण्यासारखे आहे.अंतर्गत वाद कधी रस्त्यावर येउ देत नाही.

      भाजप ज्या पद्धतीने वाटचाल करीत आहे.महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मुंबई महापालिका हस्तगत करण्याचं ठरवलं आहे.मग जे वारंवार बंडखोर आमदार व एकनाथ शिंदे गट आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे आदर्श मानतो. त्यांनी शिवसेना वाढवुन मुंबई महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता काबीज केली आहे. ते स्वप्न भंग करून भाजपची सत्ता मुंबई महापालिका मध्ये स्थापन करण्यात मदत करतील काय? बाबासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांच्या रक्ताच्या मेहनतीवर पाणी फेरतील काय?

या.एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व मा.देवेन्द्र फळणविस साहेब उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

                                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                             (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments